मुंबई : सोशल मीडियावरती आपल्याला नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. त्यात आपल्याला प्राणी, डान्स, जेवण असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावरती वाईल्ड लाईफचा एक व्हिडीओ ट्रेंडिगवरती ( Trending video) आहे. जो लोकांना आश्चर्यचकित करत आहे. हा व्हिडीओ शिकारीचा आहे. जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंगलात सगळेच छोटे मोठे प्राणी फिरत असतात आणि प्रत्येक प्राणी आपल्या जेवणाच्या (भक्षाच्या) शोधात असतो. जंगलातील मोठे शिकारी आपल्या शिकारासाठी तग धरुन बसतात आणि वेळ मिळताच आपला शिकार पकडतात.


असाच काहीसा प्रकार एका जंगली डुकराच्या बाबतीत घडला जो मोकळ्या जंगलात फिरायला गेला खरा पण तो दोन सिंहिणींचा शिकार बनला.


नुकताच लेटेस्ट साइटिंग्सच्या यूट्यूब चॅनलवर हृदयाचा ठोका चुकावणारा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक जंगली डुक्कर सिंहिणींचा वाईटरित्या शिकार होतो. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कमध्ये शॅनन फिनेगनने शूट केला आहे. व्हिडीओमध्ये एक डुक्कर जंगलाच्या मोकळ्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे.


असे दिसते की डुक्कर जंगलाच्या वाटेवरून निष्काळजीपणे चालत आहे, परंतु त्याला हे माहित नाही की एक सिंहीण त्याच्यावर उडी घेऊन त्याला पकडण्याची वाट पाहत आहे. सिंहिणीचे डोके झुडपांमध्ये दिसते, जी हळूहळू डुकराच्या जवळ जात असल्याचे दिसते.


ती डुकराच्या दिशेने इतक्या दबक्या पावलांनी सरकते की हे कोणाच्याही लक्षातही येत नाही. डुक्कर जवळ येताच सिंहीण त्याच्यावर झेप घालते आणि डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच सिंहीण त्या डुकराला पकडते.  हे दृश्य अतिशय भयावह आहे आणि ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल.



सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया


हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. याला 92 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोक कमेंट्समध्ये जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने सांगितले की, 'जर त्या वाटेवर एक माणूस चालत असेल तर लपलेली सिंहीणीने त्याचं काय केलं असतं?' दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट केलं 'सिंह उत्कृष्ट शिकारी आहेत'. अतिशय मनोरंजक माहिती देताना एका व्यक्तीने लिहिले - "व्हिडिओच्या सुरुवातीला सिंह आपली दिशा बदलतो. तो लपविण्यासाठी नाही तर वाऱ्याची दिशा समजून घेण्यासाठी करतो जेणेकरून तो डुकराच्या दिशेने वेगाने धावू शकेल."