नवी दिल्ली : मुळची भारतीय आणि इस्रायलची गायिका लेआरा इत्झेक ४ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौ-यावर भारत आणि इस्रायलचे राष्ट्रगीत गाणार आहे. इस्रायलमध्ये जन्माला आलेली लायराचे आई-वडील मुंबईहून इस्रायलमध्ये स्थायिक झाले. १५ वर्षाच्या वयोगटात लेराने संगीत शिकणे सुरु केलं. पुण्याच्या सुर सर्वधन इन्स्टिट्यूटमध्ये तिने त्याचं शिक्षण घेतलं. गुरू पद्म तळवरकर यांच्याकडून तिने भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. लायराने 1991 ते 1998 दरम्यान भजन आणि गजल गायन देखील शिकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दिल का डॉक्टर' सिनेमामध्ये लायराला बॉलिवूडमध्ये प्रथमच गाणं गाण्याची संधी मिळाली. या दरम्यान तिने सोनू निगम, कुमार सानू आणि उदित नारायण यांच्यासोबत गाणं गायलं. तिचे बॉलिवूड सिंगिंग करिअर वर जात असतांनाच तिला परत इस्रायलला जावं लागलं. घराची आठवण येत असल्यामुळे तिने बॉलिवूडचे अनेक ऑफर्स नाकारले.


लायरा म्हणते की, "मी 23 वर्षांची होती तेव्हा घरापासून 8 वर्ष दूर राहिल्यामुळे मी खूप चिंतीत झाली." भारत मला खूप आवडतो पण मी माझ्या कुटुंबापासून दूर राहू शकत नाही."


इस्रायल म्यूजिक इंडस्ट्रीमध्ये तिची खास ओळख झाली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौ-यावर ती राष्ट्रगान गाणार आहे. याआधी 2015 मध्ये इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे राष्ट्राध्यक्ष स्वागत केले त्यावेळी डिनर दरम्यान गाण्यासाठी तिची निवड केली गेली होती.