Ram Mandir Inauguration : अयोध्येत  भव्य राम मंदिर उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते 22 जानेवारीला प्रभू श्री राम राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा करण्यात येणार आहे  (Foundation Ceremony).  संपूर्ण देशवासीय या सोहळ्याची अतुरतेने वाट पाहत आहेत. फक्त भारतातच नाही तर परदेशातही प्रभू श्री राम यांचा महिमा आहे. भारता प्रमाणे थायलंडमध्ये देखील मोठी अयोध्या नगरी आहे. थायलंड या देशात अजूनही प्रभू श्री 'राम' यांनाच राजा मानला जाते. तर, येथील एक राज घराणे स्वत:ला रामाचे अवतार मानतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात प्रश्रू श्री राम यांना विष्णूचा अवतार मानतात. प्रश्रू श्री राम यांचे पूजन करतात.  थायलंडमधील चक्री घराणे स्वतःला रामाचे अवतार मानतात.  हे घराणे आपल्या नावात राम शब्द वापरतात. चक्री वंशातील सध्याचा राजा राम 'दशम' नावाने ओळखला जातो. पूर्वी या घराण्यातील राजे आपल्या नावामागे राम ही पदवी जोडत होते. नावा मागे प्रभू राम यांचे नाव जोडण्यामागे युरोपियन प्रभाव आहे. या घराण्यातील सहावा राजा वजिरवुध याला इंग्लंडमध्ये शिकत असताना जॉर्ज पाचवा, लुई दुसरा यांसारख्या तिथल्या राज्यकर्त्यांची नावे वाचून-ऐकल्यावर ही कल्पना सुचली असे सांगितले जाते.


वजिरवुद्ध राजानेने प्रथम स्वतःला राम 'षष्ठ' म्हणवून घेतले. यानंतर या घराण्यातील राजांना रामासह क्रमांक देण्याची प्रथा देखील सुरू झाली. नावाला राम ही पदवी जोडण्यापूर्वी काही प्रयोगही केले गेले.राजा वजिरवुध यांनी इंग्रजी भाषेनुसार स्वतःला 'राम VI' म्हटले, तेव्हा त्याची परंपरा रत्चाकनच्या वापराशी जोडली गेली. 'रामा दसम' म्हणजेच 'रामा X'  म्हणून ओळखळला जातो.


कशी आहे थाललंडमधील अयोध्या नगरी?


रॅम महा वजिरालोंगकॉर्न हे रामाच्या रूपात थायलंडचे राजा आहेत.  2020 मध्ये राजाची संपत्ती 43 अब्ज डॉलर्स एवढी होती. थायलंडमधील एक प्रसिद्ध शहर अयुथया या नावाने ओळखले जात होते. हीच थाललंडमधील अयोध्या नगरी आहे. रामायणात ज्या संदर्भात अयोध्येचा उल्लेख भगवान रामाची राजधानी म्हणून करण्यात आला आहे. त्याप्रमाणे थाय राजे अयुथयाचा संबंध अयोध्येसह जोडतात. 1351 AD पासून सियामी शासकांची राजधानी असलेली आयुथया 1767 मध्ये बर्मी सैन्याने जवळजवळ पूर्णपणे नष्ट केली होती. थाई धार्मिक ग्रंथाचे नाव रामकीन आहे, ज्याचा दर्जा थाई रामायणाप्रमाणेच आहे. '300 रामायण' हे पुस्तक लिहिणाऱ्या रामानुजन यांनी या पुस्तकाची तुलना वाल्मिकी रामायणाशी केली आहे.