28 वर्षांपूर्वी 116 कोटींची लॉटरी लागल्याने झाला कोट्यधीश! आज विकतोय खिडक्या; नेमकं घडलं काय
116 crore Rupees Lottery Winner: हा व्यक्ती आजही त्याला कोट्यधीश बनवणाऱ्या क्रमांकाचेच लॉटरीचे तिकीट दर आठवड्याला विकत घेतो. मात्र त्या मोठ्या लॉटरीनंतर त्याला पुन्हा एवढी मोठी लॉटरी कधीही लागलेली नाही.
116 crore Rupees Lottery Winner: एका व्यक्तीने नॅशनल लॉटरीमध्ये 11 मिलियन युरोची म्हणजेच भारतीय चलनानुसार 116 कोटींची लॉटरी जिंकली. कोट्यधीश झाल्यानंतर अनेक दशकांनी हा लॉटरी विजेता आपल्या लॉटरी विजयापूर्वीच्या आयुष्यात परतला आहे. 61 वर्षीय मार्क गार्डिनर आणि त्यांचा पूर्वीचा बिझनेस पार्टनर पॉल मॅडिसन यांना 1995 साली 22 मिलियन युरो म्हणजेच 232 कोटींची लॉटरी लागली होती.
आता पाहतात खिडक्या बनवायच्या कंपनीचा कारभार
क्षणात कोट्यधीश झाल्याने मार्क आणि पॉल यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. मार्क हे ब्रिटनचे रहिवाशी आहे. एवढा पैसा मिळाल्यानंतर या दोघांची लाइफ सेट झाली असं अनेकांना वाटलं. मात्र तसं घडलं नाही. मार्क यांनी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली. त्यामुळे त्यांचे कोट्यवधी रुपये वाया गेले. मार्क यांची चौथी पत्नी ब्रेंडा यांनीही चुकीच्या जागी नवऱ्याचे पैसे गुंतवणूक त्याला हातभार लावला. मार्क यांना आपला फार कमी पैसा योग्य ठिकाणी गुंतवता आला. त्यांनी युनायटेड फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूक केली. तसेच त्यांनी आपल्या क्रॉप्ट ग्लास कंपनीमध्ये 2 मिलियन युरोची गुंतवणूक केली. सध्या मार्क हे याच खिडक्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा कारभार पाहतात.
आता लॉटरी लागली असती तर...
"मला चुकीच्या अर्थाने घेऊ नका, पण मी ती लॉटरी तेव्हा न जिंकता आता वयाच्या 61 व्या वर्षी जिंकलो असतो तर आजपर्यंत मी अनेक गोष्टी करुन इथपर्यंत पोहोचलो असतो. मी काम करणं थांबवलं असतं. मी कंपनीमध्ये पैसा गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. मी ही कंपनी पुढे नेऊ शकतो का? माझ्याकडे कंपनी पुढे घेऊन जाण्याचं ज्ञान, कौशल्य आणि क्षमता आहे का हे मी तपासून पाहत होतो. ही एक परीक्षा होती आणि मी यशस्वी ठरलो आहे. मी एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तर मला माझ्या कर्मचाऱ्यांना पगार देता येणार नाही अशी सध्या कंपनीची परिस्थिती नसल्याचं मला समाधान आहे," असं मार्क म्हणाले.
दर आठवड्याला काढतात लॉटरीचं तिकीट
मार्क हे फुटबॉलचे चाहते असून अजूनही ते फुटबॉलशी संबंधित घडामोडी फॉलो करतात. हास्टिंग येथे त्यांचं एक लोकल फुटबॉल क्लबही आहे. त्यांनी बार्बाडोसमध्ये घरही विकत घेतलं आहे. मार्क यांचा बराचसा पैसा वाया गेला असला तरी सर्वच पैसा वाया गेला असं म्हणता येणार नाही. काही ठिकाणी गुंतवलेल्या पैशांमधून त्यांना फायदाच झाला. ते आजही दर आठवड्याला लॉटरीचं तिकीट काढतात. ते दरवेळी तोच नंबर निवडतात ज्यामुळे त्यांना 1995 साली लॉटरी लागली होती.
त्या पार्टनरच्या संपर्कात नाही
मार्क यांचा तत्कालीन पार्टनर पॉल सध्या स्कॉटलंडला वास्तव्यास असतो. ही माहितीही मार्क यांनीच दिली. पॉलने जिंकलेल्या रक्कमेचं काय केलं हे आपल्याला ठाऊक नसल्याचं मार्क म्हणाले. दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत की नाही हे त्यांनी सांगितलं नाही.