Attack on Putin`s Car: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ताफ्यावर हल्ला, रशियाला हादरवणारी घटना
Russian President Putin: रशियाचे राष्टाध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
Attack on Putin's Car : रशिया आणि युक्रेन (Rassia Ukraine War) युद्धामुळे जगावर संकंट ओढावलं असतानाच आता रशियातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. रशियन माध्यमातून आलेल्या माहितीनुसार व्लादिमीर पुतीन (Attack on Putin's Car) या हल्लातून थोडक्यात बचावले आहेत. युरो विकली न्यूजने याबाबत वृत्त दिलंय.
पुतीन यांच्यावर गाडीवर हल्ला
राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) त्यांच्या निवासस्थानी जात असताना ही घटना घडली. यावेळी अचानक त्यांच्या ताफ्यातील पहिल्या गाडीला अॅब्युलन्सने अडवलं. त्यानंतर काही सेकंदात पुतीन यांच्या गाडीच्या डाव्या चाकाजवळ जोरदार धमाका झाला आणि सर्वत्र धुरीचं साम्राज्य पसरलं. नेमकं काय झालं हे समजेपर्यंत सुरक्षारक्षकांनी पुतीन यांच्याभोवती सुरक्षाकवच तयार केलं होतं. त्यामुळे पुतीन या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.
पुतीन यांच्या सुरक्षेत मोठी चूक
व्लादिमीर पुतीन हे जगातील दुसरे शक्तीशाली नेते मानले जातात. पुतीन यांच्यावर झालेला हल्ला हा रशियन गुप्तहेर एजन्सीचा (Rassian Spy Agency) मोठा पराभव मानला जातोय. पुतीन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याने अनेक सुरक्षारक्षकांना अटक देखील करण्यात आली, तर अनेकांची हकालपट्टी देखील करण्यात आली. रशिया युक्रेन युद्धात रशियन सैन्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं असतानाच आता रशियाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.
तीन आठवड्यापूर्वी असंच घडलं...
राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांचे राईट हँट म्हणून ओळखले जाणारे अलेक्झांडर डुगिन (Alexander Dugin) यांच्या मुलीची हत्या करण्यात आली होती. अलेक्झांडर डुगिन यांची मुलगी डारिया डुगिनची (Daria Dugin) कार बॉम्बने उडवून देण्यात आली होती. अलेक्झांडर डुगिन हे पुतीन यांचे जवळचे सहकारी आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. डारियाच्या हत्येनंतर आता पुतीन यांच्यावर झालेला हल्ला रशियाला हादरवणारा आहे.