केनिया : प्रत्येक समाजाच्या चालीरीती वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न आहेत, परंतु यातील काही प्रथा अशा आहेत की त्यावर विश्वास ठेवणे सोपे नाही. पश्चिम केनियाच्या लुओ जनजातीच्या अशाचं काही विचित्र प्रथा आहेत. जन्म, मृत्यू, लग्नापासून सेक्सपर्यंतच्या त्यांच्या परंपरा खूप विचित्र आहेत.  आज जग सर्वच स्तरात पुढे जात आहे. अशात या परंपरा मोठ्या धक्कादायक वाटतात. पश्चिम केनियामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचं शुद्धीकरण केलं जातं. प्राचीन प्रथेनुसार पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहासोबत एक रात्र झोपावं लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान, पत्नीला कल्पना करावी लागते की ती तिच्या पतीवर प्रेम करत आहे. असे मानले जाते की यानंतर तिच्या मृत पतीचा आत्मा मुक्त होतो आणि यानंतर असे मानले जाते की स्त्री शुद्ध झाली आहे आणि ती पुन्हा लग्न करू शकते. महत्त्वाचं म्हणजे लुओ जमातीमध्ये आत्महत्या करणं मोठं पाप समजलं जातं. 



लुओ जमातीमध्ये कोणी आत्महत्या केली तर त्याच्या मृतदेहाचा अपमान करण्यात येतो. त्या व्यक्तीचा मृतदेह वेगळ्या स्मशानभूमीत पुरला जातो. कुटुंब जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल शोकही करू शकत नाही.


लुओ जमातीमध्ये असा नियम आहे की मोठा भाऊ किंवा बहिणीचे लग्न होण्यापूर्वी लहान भाऊ किंवा बहीण लग्न करू शकत नाही. यामुळे फार कमी लोक आपल्या आवडीचा जीवनसाथी निवडू शकतात कारण त्यांच्यावर लवकर लग्न करण्याचा दबाव असतो.


लुओ जमातीमध्ये पेरणी आणि कापणीच्या वेळी शारीरिक संबंध ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवसांमध्ये पतीने पत्नीशी संबंध ठेवणे आवश्यक असते. असे मानले जाते की या नियमांचे पालन न केल्याने देवांना राग येतो.