लंडन : महात्मा गांधींच्या चष्म्याच्या लिलावाला विक्रमी किंमत आली आहे. ब्रिटनमध्ये एका लिलाव कंपनीने पार पाडलेल्या या लिलावात गांधींच्या सोन्याचा मुलामा असलेल्या चष्म्याला २ लाख ६० हजार पाऊंड म्हणजेच २ कोटी ५५ लाख रुपये एवढी किंमत आली आहे. महात्मा गांधींनी घातलेला हा चष्मा दक्षिण आफ्रिकेत असताना एकाला दिला होता. या चष्म्याला लिलावात १० हजार ते १५ हजार पाऊंड मिळतील, असं वाटत होतं, पण ऑनलाईन लिलावामध्ये ही बोली वाढत गेली आणि अखेर सहा अंकी रकमेवर ही बोली थांबली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईस ब्रिस्टल ऑक्शन्स कंपनीचे लिलावकर्ते ऍण्डी स्टोव म्हणाले, 'अविश्वसनीय गोष्टीला अविश्वसनीय किंमत मिळाली आहे. ज्यांनी बोली लावली त्यांचे धन्यवाद. या चष्म्याच्या लिलावातून आम्ही लिलावाचा विक्रमच केला नाही, तर याचं ऐतिहासिक महत्त्वही वेगळंच आहे.'


इंग्लंडच्या साऊथ ग्लुसेस्टरशायरच्या मंगोट्सफील्डमधल्या एका वृद्ध व्यक्तीने लिलावात हा चष्मा विकत घेतला आहे. हा वृद्ध व्यक्ती त्याच्या मुलीसोबत लिलावाच्या २ लाख ६० हजार पाऊंडचे पैसे देईल. 


विक्रेत्या कुटुंबाकडे महात्मा गांधींचा हा चष्मा खूप आधीपासून होता. महात्मा गांधींनी १९१० ते १९३० या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश पेट्रोलियममध्ये काम करत असताना हा चष्मा आमच्या नातेवाईकांना भेट म्हणून दिला होता, असं माझ्या वडिलांनी मला सांगितल्याचं विक्रेता म्हणाला. 


लिलावकर्ते ऍण्डी स्टोव यांनीही विक्रेत्याल्या त्याच्या वडिलांनी ५० वर्षांपूर्वी सांगितलेल्या या चष्म्याबद्दलच्या माहितीमध्ये त्याच्या बोलण्यावरून तथ्य असल्याचं दिसत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.