देशाची सजा तर पंतप्रधान पुत्राची मजा, राजपक्षे परिवाराचे श्रीलंकेतून पलायन!
महिंदा राजपक्षे यांचा मुलगा योशिता राजपक्षे याला त्याच्या पत्नीसह शेवटच्या वेळी सिंगापूर विमानतळावर बघण्यात आले आहे.
मुंबई : (Srilanka crisis) श्रीलंकेवर आर्थिक संकट कोसळलं असतांना आता एक नवीन चर्चा रंगू लागली आहे. श्रीलंकेला आणीबाणी सारख्या मोठ्या संकटात सोडून राजपाक्षे परिवार देश सोडून पळाल्याचे वृत्त आता समोर येत आहे. महिंदा राजपाक्षे यांचा मुलगा योशिता राजपक्षे याला त्याच्या पत्नीसह शेवटच्या वेळी सिंगापूर विमानतळावर बघण्यात आले आहे.
महिंदा राजपक्षे यांच्या सरकारमध्ये योशिता हा प्राईम मिनीस्टर चिफ ऑफ स्टाफ या दुसऱ्या सर्वात महत्वाच्या पदावर कार्यरत होता. याआधी योशिताने श्रीलंकेच्या नेव्ही मध्ये लेफ्टिनेंट कमांडर म्हणून काम केले आहे.
देशात मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरु असतांना माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे हे सध्या त्यांच्या परिवारा सोबत श्रीलंकेच्या त्रिनकोमाली येथिल नेवल बेसमध्ये आश्रय घेत आहे. श्रीलंकेत सुरु असलेल्या या परिस्थीतीला राजपक्षे आणि त्यांचा परिवारचं जबाबदार आहे असा नागरिकांचा आरोप आहे.
संतापलेली जनता तेथे हिंसक आंदोलन करु लागली आहे. जनतेचा रोष कमी व्हावा म्हणून राजपक्षे यांनी ताबडतोब सर्व नेत्यांचे राजीनामे घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. श्रीलंकेत आता सिव्हिल वॉर प्रमाणे परिस्थिती असतांना राजपक्षे यांचा परिवार आणि त्यांचे समर्थक देश सोडून जात आहेत.
शांतपणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना राजपक्षे यांनी भडकवलं त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून सतत होत आहे.