मुंबई : कोरोना संसर्ग वाढल्याने आणि देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ सुरु झाल्याने आता मलेशियाने देशव्यापी लॉकडाउन जाहीर केले आहे. गेल्या  24 तासांत देशभरात 3 हजार 807 नवीन रुग्ण आढळले आहे. पंतप्रधान मुहीद्दीन यासीन (Prime Minister Muhyiddin Yassin) यांनी याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, सर्व आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास वाहतुकीवर बंदी असेल तसेच सामाजिक मेळाव्यांनाही बंदी घातली जाईल. शैक्षणिक संस्था बंद असतील परंतु आर्थिक क्षेत्रातील उपक्रम सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल. (Malaysia declares lockdown)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेशियाला कोविडच्या तिसर्‍या लाटेचा सामना करावा लागत आहे, असे मुहीद्दीन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. लॉकडाऊन हा 7 जूनपर्यंत सुरू राहिल. 


पंतप्रधान म्हणाले की, 'कोरोना विषाणूचे नवीन रूप आणि त्यांच्या संसर्गामुळे लॉकडाउन आवश्यक होते. यामुळे देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर ताण पडत होता. अलिकडच्या आठवड्यात बरीच प्रकरणे पाहायला मिळाली. सोमवारी तीन हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत एकूण 444,484 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 1,700 मृत्यूची नोंद झाली आहे. कोविडच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी जानेवारी महिन्यात मुहीद्दीन मलेशियात आपत्कालीन घोषित करण्यात आली होती. अद्याप मलेशिया आपत्कालीन स्थितीत आहे.'


इतर बातमी : Lockdown : राज्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बातमी


याआधी मलेशिया सरकारने आशिया खंडातील अनेक देशांच्या प्रवाशांवर देशात येण्यास निर्बंध घातले होते. त्यानंतर आता मलेशियाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.