समुद्रकिनारी `अशा` पद्धतीने पुस्तक विकण्याची अट, प्रति महिना 59 हजार रुपयांची Salary
जगात एकापेक्षा एक अशी वेगळी कामं आहेत. या कामासाठी चांगला पगार देखील मिळतो.
Maldive Beach Book Selling Job: जगात एकापेक्षा एक अशी वेगळी कामं आहेत. या कामासाठी चांगला पगार देखील मिळतो. असाच एक पुस्तक विक्रीचा जॉब मालदीवच्या कुनफुनाधू बेटावर आहे. जर तुम्ही समुद्रकिनारी आरामात पुस्तकं वाचणं पसंत करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बेटावर स्थित असलेल्या एका लक्झरी रिसॉर्टने पुस्तकांच्या विक्रीसाठी वर्षभराच्या करारावर नवीन भरती सुरु केली आहे. सोनावा फुशी रिसॉर्टने 'बेअरफूट बुकसेलर' पोस्टसाठी पुन्हा एकदा अर्ज स्वीकारण्यास सुरु केलं आहे. बेटावर एका वर्षासाठी पुस्तकाचं दुकान चालवण्यास परवानगी दिली जाईल.
एका उत्कट पुस्तकप्रेमी शोधात असलेल्या अल्टिमेट लायब्ररीचे विक्री व्यवस्थापक अलेक्स मॅक्विन यांनी सांगितलं की, अर्जदार साहसी आणि सर्जनशील असावा. त्याचबरोबर संपूर्ण दिवस अनवाणी घालवण्यास सक्षम असावा. कारण या बेटावर कोणालाही बूट घालण्याची परवानगी नाही. हा करार ऑक्टोबरमध्ये सुरु होईल आणि वर्षभरासाठी असेल. बेअरफूट पुस्तक विक्रेत्याला दररोज पुस्तकांचे दुकान चालवावे लागेल. यासोबतच अकाउंटिंग आणि शेअर मार्केटिंगही करावे लागणार आहे. अल्टिमेट लायब्ररीचे मॅक्वीन यांनी सांगितलं की, 'अर्जदाराला स्वतःहून इथे यावे लागते आणि नोकरीनंतर सर्व काही पाहावे लागते.'
अर्जदाराची निवड झाल्यास मिळणार इतका पगार
इन्स्टाग्रामवर नोकरीबाबत जाहिरात देताना द बेअरफूट बुकसेलर्सने लिहिलं आहे की, "सोनेवासोबत भागीदारी करून आम्ही सोनेवा फुशीसाठी आमचा पुढील बेअरफूट बुकसेलर शोधत आहोत! बेटावरील पुस्तक विक्री हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे." निवड झालेल्या अर्जदाराला मोफत निवास आणि भोजन मिळू शकते. त्याचबरोबर वर्क परमिट आणि फ्लाइट फी रिसॉर्टद्वारे कव्हर होऊ शकते. या कामासाठी दरमहा 59 हजार रुपये मिळणार आहेत.