मुंबई : चक्क ३०व्या मजल्यावरून नोटांचा पाऊस करणाऱ्या २९ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चीनमधील शॉपिंग्बा याठिकाणी घडली आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. नोटांचा पाऊस करणाऱ्या व्यक्तीचं नाव बो असं आहे. ड्रग्सचे सेवन केल्यामुळे तो नशेत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नशेमध्ये त्याने दुपारी दीडच्या सुमारास बाल्कनीमध्ये उभे राहून पैसे फेकण्यास सुरूवात केली. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी या बो नामक व्यक्तीला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आकाशातून होणारा नोटांचा पाऊस पाहताच पैसे जमवण्यासाठी लोकांची तोबा गर्दी जमली. अनेकांनी खिशे भरून पैसे घेतले. शिवाय रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सुरवातीला  नोटांचा पाऊस पाऊस पाहून नागरिकांना मोठा धक्का बसला. काहींनी तर हा क्षण आपल्या मोबाईल टिपला. त्यानंतर  पैसे गोळा करण्यासाठी लोकांची पळापळ सुरू झाली. 


ड्रग्सच्या नशेमध्ये बोने हे कृत्य केल्यचा खुलासा अद्याप प्रशासनाने केलेला नाही. ज्यांनी बोद्वारे टाकलेले पैसे गोळा केले आहेत ते परत करतील अशी अपेक्षा आहे. परंतु पोलिसांनी याप्रकरणी लोकांना कोणत्याही प्रकारचे आवाहन केलेले नाही.