Vim साबणाने दात साफ करायचा व्यक्ती, तोंडाची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण
व्यक्तीने आपले दात चमकवण्यासाठी जे केलं ते खरोखरचं धक्कादायक आहे.
मुंबई : प्रत्येकाला असे वाटत असते की, आपले दात पांढरे असावेत आणि ते मोत्यासारखे चमकावे. जर तुमचे दात चमकदार असतील तर लोकांमध्ये तुमची चांगली छाप पडेल असे देखील काही लोकांना वाटत असते. तेच जर तुमचे दात घाणेरडे किंवा पिवळे असतील तर तुमचे व्यक्तिमत्व खरा दिसू शकते. यामुळेच लोकं आपले दात स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी विविध मार्गांचा वापर करतात. त्यासाठी लोक महागड्या टूथपेस्ट पासून ते डॉक्टरकडे ट्रीटमेंट करेपर्यंत खूप खर्च करतात. ज्यामुळे त्यांचे दात स्वच्छ दिसतात.
परंतु एका व्यक्तीने आपले दात चमकवण्यासाठी जे केलं ते खरोखरचं धक्कादायक आहे. जे पाहून दातांच्या डॉक्टरला म्हणजेच डेंटीस्ट देखील पाहत राहिला. कारण चमकदार दात मिळवण्याच्या नादात या व्यक्तीने आपल्या दातांची एकदम वाईट अवस्था करुन घेतली.
चमकदार दात तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालतात. म्हणून, शरीराच्या इतर भागांची काळजी घेण्याइतकेच दातांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
मँचेस्टरमधील 74 वर्षीय डेंटिस्ट बर्नार्ड लेस्टरने आपल्या नवीन पुस्तकात आपल्या एका घटनेचा उल्लेख केला. ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. डॉ. बर्नार्ड यांनी सांगितले की, एकदा त्याच्या क्लिनिकमध्ये आलेल्या एका क्लायंटचे दात पाहून त्याला धक्का बसला, कारण त्या व्यक्तीचे दात खूप चमकदार होते. कोणाचे दात इतसे चमकदार असणे हे फारसे कमी वेळा घडते.
त्यानंतर तपासादरम्यान डॉक्टरांनी त्या व्यक्तीला आपले तोंड उघडाला सांगितले तेव्हा त्यांना आणखी आश्चर्य वाटले. कारण त्या क्लायंटच्या तोंडात फोड आले होते. जेव्हा डॉक्टरांनी याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की, तो विम बारने दात साफ करायचा.
डॉ. बर्नार्ड यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात असे विचित्र प्रकरण पाहिले नव्हते. डॉक्टरांनी लिहिले आहे की, या व्यक्तीने विम बार वापरुन आपले दात साफ केल्याने स्वत:च्या हिरड्या खराब करुन घेतल्या. ज्यामुळे त्याच्या संपूर्ण तोंडाला फोड आले होते.
त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. डॉक्टरांच्या मते, जेव्हा त्याने विचारले की तुम्ही कोणती टूथपेस्ट वापरता, तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की तो लाँड्री साबण विम बारने दात स्वच्छ करतो. हे ऐकल्यावर डॉ. बर्नार्ड आश्चर्यचकित झाले.
डॉ. बर्नार्ड यांनी सांगितले की, त्याच्याकडे असे अनेक ग्राहक येतात आणि त्यांना विनंती करतात की, त्यांनी आपले दात त्वरित उजळवावेत. त्यापैकी बहुतेक लोक हे लवकरच लग्न बांधनात अडकणार असतात. परंतु डॉ. बर्नार्ड म्हणतात की, दात हळूहळू स्वच्छ करण्याकडे लक्ष द्या. त्यांनी आपल्या पुस्तकात लोकांना नियमितपणे ब्रश करण्याचे आवाहन केले आहे.