मुंबई : चिनचे संशोधक नेहमीच वेगवेगळे आणि अजब शोध लावत असतात. आता देखील त्यांनी असाच एक शोध लावला आहे. ज्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, पुरुष ही आता गर्भवती राहू शकतात. हा शोध सर्व जगाला आश्चर्य करणारा आहे. आतापर्यंत आपण फक्त महिला गर्भवती राहिलेले तुम्ही ऐकले असणार आणि खरेतर निसर्गाच्या नियमांप्रमाने हे असेच घडते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या शास्त्रज्ञांनी नर उंदीराला गर्भवती करण्यासाठी त्याच्या पोटात गर्भाशय टाकले आहे. यासाठी ते बर्‍याच वर्षांपासून संशोधन करत होते. ज्यानंतर आता संशोधनाचा निकाल समोर आला आहेत.


हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यापूर्वी चीनच्या वुहान लॅबमधून बाहेर पडलेल्या एका वैज्ञानिकांने असा दावा केला होता की, चीन विचित्र संशोधन करत असतो. चीनमध्ये असे अनेक संशोधनं सुरु आहेत, ज्यावर इतर देशांमध्ये  बंदी घातली गेली आहे.


चीनमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनात नर उंदराच्या शरीरावर प्रयोग करण्यात आले होते, ज्यामध्ये मादीच्या शरीरातून गर्भाशय काढून ते पुरुषाच्या शरीरात शस्त्रक्रियेद्वारे टाकण्यात आले.


यानंतर, नर तो नर गर्भवती राहिला आणि त्याने सिझेरियनच्या माध्यमातून मुलांना जन्म दिला. या संशोधनानंतर आता भविष्यात पुरुष गर्भवती होण्याची शक्यता वाढली आहे.


इन्फोव्हर्सच्या अहवालानुसार या संशोधनानंतर आता मुलांना जन्म देण्याची इच्छा असलेल्या ट्रान्सजेंडर्सना मदत केली जाईल.


हा प्रयोग कसा करण्यात आला ते जाणून घ्या


हा प्रयोग शंघायच्या नेव्हल मेडिकल युनिव्हर्सिटीने केला आहे. यात वैज्ञानिकांना प्रथम मादी उंदराच्या पोटातून गर्भाशयाच्या बाहेर काढले आणि ते नर उंदीरांच्या शरीरात शस्त्रक्रियेद्वारे टाकले. या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाच्या नंतर, तो नर गर्भवती राहिला त्यानंतर सिझेरियनच्या माध्यमातून त्याच्या मुलांना बाहेर काढले गेले.


हे संशोधन चार चरणात पूर्ण झाले. याला उंदीर मॉडेल असे म्हणतात. परंतु आतापर्यंत या संशोधनाचे सक्सेस रेट फक्त 3.68 टक्के असल्याचे नोंदवण्यात आले आहे.


आश्चर्याची बाब म्हणजे चिनी शास्त्रज्ञ आता माणसांवर उंदीराचे मॉडेल अवलंबण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत. सस्तन प्राण्याच्या या संशोधनानंतर आता माणसांमध्ये हा प्रयोग यशास्वी होण्याची आशा वाढली आहे.