चीनी झूमध्ये अस्वलाच्या वेशात माणूस उभा? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण
China Zoo Bear: हा अस्वल नसून `चीनी जुगाड` आहे, अशी खिल्ली सोशल मीडियात उडवली गेली. या व्हिडीओची जगभरात इतकी चर्चा झाली की त्यानंतर प्राणीसंग्रहालयाना यावर स्पष्टीकरण जाहीर करावे लागले. हा व्हिडीओ नेमका काय आहे? यावर प्राणी संग्रहालयाने काय स्पष्टीकरण दिले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
China Zoo Bear: स्वस्तात मस्त बनवलेल्या जुगाडासाठी चीनी वस्तू ओळखल्या जातात. त्यामुळे चीनचा कोणताही प्रोडक्ट असेल तर जगभरात त्यांच्याकडे शंकेने पाहिले जाते. असाच एक चीनचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. ज्यामध्ये चीनच्या प्राणीसंग्रहालयातील अस्वल दोन पायांवर उभा असलेला दिसत आहे. हा अस्वल नसून 'चीनी जुगाड' आहे, अशी खिल्ली सोशल मीडियात उडवली गेली. या व्हिडीओची जगभरात इतकी चर्चा झाली की त्यानंतर प्राणीसंग्रहालयाना यावर स्पष्टीकरण जाहीर करावे लागले. हा व्हिडीओ नेमका काय आहे? यावर प्राणी संग्रहालयाने काय स्पष्टीकरण दिले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हा व्हिडिओ 31 जुलै रोजी @TODAYonline या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला करण्यात आला होता. जेव्हा सोशल मीडियातील यूजर्सनी चीनच्या झेजियांग प्रांतातील 'हँगझू प्राणीसंग्रहालयाच्या 'ब्लॅक सन बीयर'चा व्हिडिओ पाहिला.हा अस्वलाच्या वेशातील माणूस आहे, असा काहींनी अंदाज लावला. व्हिडिओमध्ये अस्वल आपल्या मागच्या पायावर उभे राहून पर्यटकांकडे पाहत असल्याचे दिसत आहे, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
हॅंगझू प्राणीसंग्रहालयाने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. हे अस्वल म्हणजे मलायन सन बियर आहे. ही अस्वलाची सर्वात लहान प्रजाती आहे. ते तपकिरी काळ्या अस्वलाच्या अर्ध्या आकाराचे आणि पातळ असते, असे त्यांनी स्पष्टीकरणात म्हटले.
'आमचे अस्वल खरे आहे, अस्वलाच्या वेशातील माणूस नाही', असे प्राणी संग्रहालयाच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. वास्तविक, सन बिअर अस्वलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो माणसासारखा दोन पायांवर उभा असल्याचे दिसत आहे. या क्लिपमुळे तो अस्वल नसून अस्वलाच्या वेशातील माणूस असल्याची अफवा पसरली. मात्र, प्राणीसंग्रहालयाने निवेदन जारी करून या अफवा फेटाळून लावल्या आहेत. सन अस्वल हा जगातील सर्वात लहान अस्वल प्रजातींपैकी आहे. सहसा तो मोठ्या कुत्र्याचा आकार असतो, असेही सांगण्यात आले.
'Hangzhou Zoo' च्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अस्वलाचा विचार आपल्या मनात येतो तेव्हा एक महाकाय प्राणी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पण आमच्या प्राणीसंग्रहालयात आढळणारे मलायन अस्वल सडपातळ आहेत, ते जगातील सर्वात लहान अस्वल मानले जातात.
हा प्राणी खरा आहे आणि अशा प्रकारची फसवणूक सरकारी सुविधांमध्ये होणार नाही. 40 अंश सेल्सिअस तापमानात अस्वलाचा सूट घालून कोणीही माणूस जास्त काळ जगू शकणार नाही, असे प्राणी संग्रहालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.