प्रपोज करण्याची हटके पद्धत जिवावर बेतली
प्रपोज करण्याची ही पद्धत एका प्रेमविराच्या जिवावर बेतली.
लुसियाना : अमेरिकतल्या लुसियानामध्ये एका तरुणाच्या प्रेमाची शोकांतिका घडली आहे. त्यानं आपल्या प्रेयसीला अनोख्या पद्धतीनं प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला आपला जीवच गमवावा लागला. लग्नासाठी मागणी घालणारे प्रेमवीर प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रपोज करतात. पण प्रपोज करण्याची ही पद्धत एका प्रेमविराच्या जिवावर बेतली. पाण्याखाली जाऊन प्रेयसीला प्रपोज करणाऱ्या एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अमेरिकेतल्या लुसियाना प्रांतातल्या बॅटन रुज भागात ही घटना घडली.
स्टिव्हन वेबर नावाचा तरुण आणि एन्स्टोईन यांची मैत्री होती. ही मैत्री लग्नाच्या नात्यात बदलावी असं स्टिव्हनला वाटत होतं. एन्स्टोईनला हटके प्रपोज करून धक्का द्यावा अशी त्याची योजना होती. त्यासाठी त्यानं एकं अंडरवॉटर रिसॉर्ट बुक केलं. या रिसॉर्टच्या तळघरातून पाण्याचा तळ दिसत होता. एन्स्टोईनला पाण्यातून प्रपोज करण्याचा त्याचा बेत होता. प्रपोज मारण्यासाठी त्यानं पाण्यात बुडी मारली. एका पिशवीत आणलेल्या प्रपोजचा कागद पारदर्शक काचेतून एन्स्टोईनला दाखवला. त्यानंतर त्यानं साखरपुड्याची अंगठीही दाखवली. एन्स्टोईनला आकाश ठेंगणं झालं होतं. तो तिथून पाण्याच्या पृष्ठभागावर येण्यासाठी गेला. पण दुर्दैवानं तो वर आलाच नाही.
स्टिव्हन पाण्यातून दिसेनासा झाला तो कायमचा. त्याला खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात तो बुडाला. एका प्रेमकहाणीचा अंत गोड होण्याऐवजी शोकांतिकेत झाला. त्यामुळं नसतं धाडस करू नका. नाहीतर एका सुंदर प्रसंग शोकांतिकेत बदलण्यास वेळ लागत नाही.