बिजींग : वाघांनी माणसावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. वाघांच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त जणांनी बघितला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघांच्या पिंजऱ्यामध्ये या माणसानं उडी मारल्यावर चार ते पाच वाघ जाऊन त्याच्या बाजूला उभे राहिले तर एका वाघानं त्याची मान पकडली. या माणसावर हल्ला होत असताना प्राणी संग्रहालयातल्या इतर व्यक्ती या सगळ्या प्रकाराचं शूटिंग घेत होते. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ चीनमधला आहे.


याआधी मागच्याच महिन्यात बंगळुरूच्या बॅनरघट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये वाघानं कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. ४१ वर्षांचा हा कर्मचारी पिंजऱ्यात मांस टाकत असताना पांढऱ्या वाघांच्या दोन बछड्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.


वाघांच्या तावडीत सापडला आणि मग...