विमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतेय तरुणाचे कौतुक, कारण...
Trending News in Marathi: गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार. व्यक्तीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.
Trending News in Marathi: एका व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. विमान प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेने या व्यक्तीला सीट बदलण्याची विनंती केली. मात्र, या व्यक्तीने तिची विनंती अमान्य करत सीट बदलण्यास नकार दिला. त्यानंतर इंटरनेटवर मात्र या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या वागण्याचे समर्थन तर करत आहेतच पण त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. नेमकं काय झालं? त्या व्यक्तीने पोस्टमध्ये असं काय म्हटलंय हे जाणून घेऊया.
रेडीट या वेबसाइटवर त्या व्यक्तीने विमानप्रवासात त्याच्यासोबत घडलेली घटना मांडली आहे. या व्यक्तीने म्हटलं आहे की, सुट्ट्यांमध्ये मी माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी फ्लाइटमधून जात होतो. विमानप्रवास पाच तासांचा होता. माझ्या काही वैदयकीय कारणांसाठी मी माझ्यासाठी वॉशरुमजवळची सीट बुक केली होती. ही सीट मिळावी म्हणून अतिरिक्त पैसेदेखील दिले होते. मात्र, जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा एका महिलेने मला विनंती केली की मी गर्भवती असून मला सतत वॉशरुमला जावे लागते. त्यामुळं मला ही सीट द्या. मात्र, या व्यक्तीने तिला सीट देण्यास नकार दिला.
व्यक्तीने पुढे म्हटलं आहे की, त्यालाही अनेक वैदयकीय समस्या आहेत. तसंच, या सीटसाठी त्याने अतिरिक्त रक्कम देऊ केली आहे. तसंच, महिलेला जर आधीपासूनच माहिती होतं की तिला विमानप्रवास करायचा आहे तर तिने आधीच बाथरुमजवळची सीट का बुक केली नाही. तसंच, त्या व्यक्तीने दावा केला आहे की, गर्भवती महिलेची प्रकृती स्थिर होती. तिला कोणताही त्रास होत नव्हता. त्यामुळं तिने सीट बदलावी अशी परिस्थिती मला तरी वाटत नव्हते.
बाथरुमजवळची सीट मिळावी यासाठी महिलेने त्याच्यासोबत वाद घातला. यावेळी फ्लाइट अटेंडेंट यांनीही त्याची काहीच मदत केली नाही. त्यावेळी त्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करत मी चुकीचं वागलो का? असं म्हणत घडलेला सगळा प्रसंग सांगितला आहे. या व्यक्तीने त्याचा अनुभव सांगितल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्याचे समर्थन केले आहे.
सोशल मीडियावर कौतुक
या व्यक्तीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, जर त्या व्यक्तीला आरोग्यासंबंधी काही समस्या आहेत आणि त्यासाठी त्याने अतिरिक्त पैसे देऊन सीट बुक केली आहे तर त्याला सीट बदलण्याची काहीच गरज नाहीये. तो कुठेही चुकला नाहीये. असं अनेकांनी म्हटलं आहे. तर, काही जणांनी एअरलाइन्सवरही जोरदार टीका केली आहे. जर त्या व्यक्तीने सीट बदलली असती तर एअरलाइन्स त्यांने अतिरिक्त भरलेली रक्कम परत केली असती का. नसतीच केली. सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या या व्यक्तीचे समर्थन केले आहे. तसंच त्याने स्वतःसाठी स्टँड घेतला याचे कौतुकदेखील केले आहे.