Viral News: ...म्हणून `तो` 800 वर्षे जुन्या मृतदेहासोबत झोपायचा; चौकशी अधिकारीही झाले थक्क
Viral News : प्राचीन ममी इजिप्त मध्ये सापडतात. येथे पिरॅमिडमध्ये या ममी जतन केलेल्या आहेत. पेरु देशात मात्र, एका व्यक्तीच्या घरात प्राचीन ममी सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Man Sleeping With Old Mummy: एक व्यक्ती 800 वर्ष जुन्या मृतदेहासोबत झोपत होता. हा मृतदेह म्हणजे एक प्राचीन ममी आहे. या विक्षिप्त व्यक्तीने ही ममी स्वत: जवळ ठेवली होती. एकाच बेडवर तो या ममी सोबत झोपत होता. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी ममी ताब्यात घेतली तसेच त्या व्यक्तीलाही अटक केली (Man Sleeping With Old Mummy). या व्यक्तीने ही ममी स्वत: सोबत का ठेवली याबात त्याने सांगितलेले कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. पेरु (Peru) देशात हा धक्कादायक प्रकार घडला आहे(Viral News).
या व्यक्तीचे नाव ज्युलिओ असे आहे. याच्याजवळ पोलिसांना एक प्राचीन ममी सापडली आहे. ही ममी अर्थाता जतन केलेला मृतदेह 600 ते 800 वर्षे जुना असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्युलिओच्या घरात ममी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्या घरावर धडक दिली. यावेळी ही ममी ज्युलिओ याच्या बेडरुममध्ये तो झोपत असलेलल्या बेडवरच ठेवलेली पोलिसांना दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने अत्यंत विचित्र उत्तर दिले.
या ममीला ज्युलिओ आपली प्रेयसी मानत होता. ही ममी माझी आध्यात्मिक प्रेयसी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तो या ममी सोबतच झोपत होता. त्याच्या वडिलांनी त्याला ममी ही दिली होती. मागील 30 वर्षांपासून त्याच्या कुटुंबातच ही ममी ठेवण्यात आली होती. मात्र, त्याच्या वडिलांकडे ही ममी कुठून आली, याची कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. सध्या पोलिसांनी ज्युलिओ आणि त्याच्या काही मित्रांसह अटक केली आहे. पोलिसांनी ममी संबंधित विभागाच्या ताब्यात दिली आहे.
ममी म्हणजे काय?
इजिप्तच्या प्राचीन इतिहासात 'ममी'चे रहस्य दडले आहे. एखाद्या व्यक्तीचा मृतदेह विशिष्ट पद्धतीन जतन केला जातो या जतन केलेल्या मृतदेहांना ममी असे म्हणतात. इजिप्त च्या लोकांचा पुर्जन्मावर विश्वास होता. म्हणून ते ममी बनवून त्यांना एका ठिकाणी सुरक्षित ठेवून देत असत. जेणेकरून त्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाला तर त्या व्यक्तिला त्याचे शरीर पुन्हा मिळावे अशी मान्यता होती.यामुळेच इजिप्तमध्ये आजही हजारो वर्षांपूर्वी जतन केलेल्या ममी पहायला मिळतात.