लहानपणापासून पालक त्यांच्या मुलांची उंची वाढावी म्हणून विविध उपाय करुन पाहत असतात. कधी खाण्यामधून तर कधी लटकण्याचा व्यायाम करण्यापासून विविध उपाय पालक त्यांच्या मुलांवर आजमावत असतात. पण कधी उंची वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया (leg lengthening surgery) केल्याचं ऐकलंय का? नाही ना. पण परदेशात उंची वाढवण्यासाठी अशा शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. अशातच एका 68 वर्षीय व्यक्तीने पायाची शस्त्रक्रिया करून आपली उंची तीन इंच वाढवली आहे. या शस्त्रक्रियेसाठी या व्यक्तीने तब्बल 1.2 कोटी रुपये खर्च केलेते. रॉय कॉन (Roy Conn) या व्यक्तीची उंची आधी 5 फूट 6 इंच होती. पण शस्त्रक्रियेनंतर रॉय यांची उंची आता 5 फूट 9 इंच झाली आहे. (Man spent more than one crore rupees to increase his height by three inches)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साठीमध्ये असताना तुम्ही शस्त्रक्रिया का केली असे विचारले असता रॉय म्हणाले की, "ही काही मोठी समस्या नव्हती. लहानपणी मला याबद्दल फारशी माहिती नव्हती. मला माझ्या आयुष्यात आता  वेळ मिळाला आहे आणि मला ते परवडत आहे. माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला या शस्त्रक्रियेचे जास्त काळजी वाटत होती. तिला मी जसा आहे तसाच आवडत होतो. याची रिकव्हरी खूप कठीण आणि वेदनादीय होती."


रॉय यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ.केविन यांनी सांगितले की, "शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे दीड तास लागला. यामध्ये, रुग्णाला मोठ्या प्रक्रियेतून सामोरं जावं लागलं. या प्रक्रियेदरम्यान एका इंचासाठी 25 दिवस आणि तीन इंचासाठी सुमारे अडीच महिने लागले. पण मला वाटतं की जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर घरी व्यायाम करणेच योग्य ठरेल."


दरम्यान, काही वर्षांपूर्वी सॅम नावाच्या तरुणानेही पायाची लांबी वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर सॅमची उंची 5 फूट 4 इंचांवरुन 5 फूट 7 इंच झाली होती. मात्र तज्ज्ञांच्या मते, अशा शस्त्रक्रियेमुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो.