मुंबई : कोरोनामुळे अमेरिकेतील दोन राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. फ्रान्समध्ये १५ दिवसासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ७००० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास २ लाख लोकं प्रभावित झाले आहेत. कोरोना व्हायरसपुढे जगातील अनेक बलाढ्य देशांना देखील गुडघे टेकावे लागले आहेत. कोरोनामुळे न्यू जर्सी आणि सॅन फ्रांसिस्कोमध्ये कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्समध्ये १५ दिवसासाठी राष्ट्रव्यापी लॉकलाउनची घोषणा करण्यात आली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रा यांनी सोमवारी कोरोनामुळे आणखी संक्रमण होऊ नये म्हणून पुढील १५ दिवस लोकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. खूप गरज असली तरच प्रवासाची परवानगी दिली जाईल. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत.


अमेरिकेने कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंतचा कालवधी लागू शकतो. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना संबोधित करत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा स्विकार केलं की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मंदी येऊ शकते.


न्यू जर्सीच्या गव्हर्नरांनी दुकानं, मनोरंजनाची ठिकाणं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कधीही न झोपणारं न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. नाईट क्लब, सिनेमागृह, कंर्सट बंद करण्यात आले आहेत.


फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रां यांनी कोरोना संकट हे युद्धा प्रमाणे असल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी रात्री त्यांनी फ्रान्सच्या लोकांना १५ दिवस घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 


कोरोनाने आतापर्यंत ७००० हजार हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत १४५ देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. जवळपास २ लाख लोकं या व्हायरसमुळे प्रभावित झाले आहेत.


इटलीमध्ये सोमवारी १४ तासात ३६८ लोकांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत इटलीमध्ये २१५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत २७,९८० लोकांना कोरोना झाला आहे.


स्पेन, रूस, कनाडाने आपले बॉर्डर सील केले आहेत. जर्मनीने ही देशात येण्यास बंदी घातली आहे. कनाडामध्ये अमेरिकन लोकांना सोडून इतर लोकांवर बंदी घालण्यात आली आहे.