फेसबूक माहितीचा गैरवापर, मार्क झुकेरबर्गची सुनावणीच्यावेळी माफी
सोशल मीडियात आघाडीवर असलेल्या फेसबूकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याला अमेरिकी काँग्रेससमोर यावे लागले.
वॉशिंग्टन : सोशल मीडियात आघाडीवर असलेल्या फेसबूकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याला अमेरिकी काँग्रेससमोर यावे लागले. कारण त्यांच्यावर फेसबूक खासगी माहितीचा गैरवापर केलाचा आरोप ठेवण्यात आला होता. फेसबूकच्या जवळपास ८ कोटी खातेदारांची खासगी माहिती निवडणुकीसाठी दिली. त्यामुळे त्याच्यावर जगभरातून टीका होऊ लागली. याप्रकरणी त्याने माफीही मागतली. आमची मोठी चूक झाली, माफ करा. दरम्यान, मार्क झुकेरबर्गची अमेरिकी काँग्रेससमोर सुनावणी झाली. आम्ही आमची सामूहिक जबाबदारी ओळखली नाही, ही आमची मोठी चूक झाली. त्याबाबत मी दिलगीरी व्यक्त करत आहे. फेसबूक खातेदार वापरत असलेल्या अॅपमधून त्यांची माहिती घेतली गेली. यात आम्ही काहीच केले नाही. यातून पुढे खोटया बातम्या, निवडणुकीत हस्तक्षेप, द्वेषमूलक वक्तव्ये यासारखे अनेक परिणाम झाले, असे तो म्हणाला.
झुकेरबर्गचे निवेदन
केंब्रिज अॅनॅलिटिकाने चोरी केलेला डेटा कशाप्रकारे निवडणुकीवर प्रभाव पाडून शकला असता याबद्दल या सुनावणीत त्याने सांगितलं. यासाठी अनेक अकॉउंट डिलीट करण्यात आलं असल्याची माहितीही त्याने दिली. आमची कंपनी निवडणूक प्रक्रिया निपक्षपाती व्हावी यासाठी कटीबद्ध आहे, असे निवेदन झुकेरबर्गने दिले.
आम्ही आमची सामूहिक जबाबदारी ओळखली नाही, ही आमची मोठी चूक झाली. त्याबाबत मी दिलगीरी व्यक्त करत आहे. फेसबूक खातेदार वापरत असलेल्या अॅपमधून त्यांची माहिती घेतली गेली. यात आम्ही काहीच केले नाही. यातून पुढे खोटया बातम्या, निवडणुकीत हस्तक्षेप, द्वेषमूलक वक्तव्ये यासारखे अनेक परिणाम झाले, असे तो म्हणाला.
निवडणुका अखंडत्व राखण्यासाठी
दरम्यान, २०१८ हे वर्ष संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत, पाकिस्तानसह अनेक देशांत निवडणुका होणार आहेत. अमेरिकी काँग्रेस समोरील सुनावणी दरम्यान झुकेरबर्गने पुन्हा भारताचा उल्लेख केला. केंब्रिज अॅनॅलिटिकाने चोरी केलेला डेटा कशाप्रकारे निवडणुकीवर प्रभाव पाडू शकला असता याबद्दल सांगितले. आमची कंपनी जगभरातील निवडणुका अखंडत्व राखण्यासाठी बांधिल आहे, असे आश्वासन देताना यापुढे असं पुन्हा होणार नाही, असे स्पष्ट केले.
हे लक्षात आले नाही! - मार्क
झुकेरबर्ग यांने केंब्रिज अॅनॅलिटीका प्रकरणाची व्यक्तिगत जबाबदारी स्विकारत असल्याचंही त्याने जाहीर केलं होते. मी खूप आदर्शवादी राहिलो. दोन अब्ज खातेदारांच्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो, हे लक्षात आले नाही. मार्कने सिनेटर बिल नेल्सन आणि इतर काँग्रेस प्रतिनिधींची भेट घेतली. नेल्सन यांनी सांगितले, झुकरबर्ग यांच्याशी भेट झाली. त्यांनी खातेदारांची व्यक्तिगत माहिती सुरक्षित न ठेवल्याबाबत माफी मागितली आहे.