मुंबई : वैवाहिक जीवनात, जेव्हा जोडीदारावरुन एखाद्याचा विश्वास तुटतो, तेव्हा अनेक वेळा लोकांची वाईट अवस्था होते. ते हा धक्का स्वीकारु शकत नाहीत, ज्यामुळे बऱ्याचदा असे लोकं टोकाचे पाऊल उचलतात.परंतु असे काही लोक असतात जे आपल्या जोडीदाराला क्षमा करतात आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतात. मात्र, एका महिलेने आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठी वेगळीच युक्ती (Husband Cheats Wife) अवलंबली. महिलेने एका रिलेशनशिप पोर्टलवर या गोष्टीचा खुलासा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने सांगितले की, तिचा पती स्वभावाने खूप चांगला आहे. तो तिची खूप काळजी घ्यायचा. त्याचे वैवाहिक आयुष्य खूप चांगले चालले होते. पण एक दिवस त्या महिलेने असे काही पाहिले जे पाहून तिचा विश्वासच बसत नव्हता की, तिच्यावर इतका प्रेम करणार नवरा तिच्यासोबत असं काही तरी करेल म्हणून.


या महिलेच्या नवऱ्याचे तिच्या शेजारणी बरोबर संबंध होते. एके दिवशी या महिलेने तिच्या नवऱ्याला पुराव्यानिशी पकडले. आपल्या पतीने आपली फसवणूक केल्याचे पाहून तिला धक्का बसला.


परंतु पतीचे रहस्य उघड झाल्यानंतर महिलेने शांत राहण्याचा प्रयत्न केला आणि तिचे वैवाहिक जीवन वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ती फक्त 18 महिनेच तिच्या पतीच्या या वागण्याला सहन करू शकली. यानंतर मात्र या महिलेने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.


महिलेने सांगितले की, तिच्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर, ती विचार करत होती की, ती पुन्हा मुलांना डेट करू लागेल आणि कोणाशीही काही भावनीक संबंध ठेवणार नाही. पण हे होऊ शकले नाही, कारण त्यात तिला आनंद मिळत नव्हता. यानंतर महिलेला एक वेबसाइट सापडली जी फक्त विवाहित लोकांसाठी होती. विवाहित लोक या वेबसाइटवर एकमेकांना डेट करायचे.


यानंतर महिलेने वेबसाईटवर आपले खाते ओपन केले आणि आता ती दोन विवाहित पुरुषांना डेट करत आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, तिला आता कोणाशीही गंभीर संबंध ठेवण्याची इच्छा नाही. तिला आता कोणकडून ही प्रेमाची किंवा कोणतीही आशा नाही. ती आता हे सगळं फक्त तिचा एकटेपणा घालवण्यासाठी करत आहे.