मुंबई: एखाद्या हॉलिवूड सिनेमात सीन घडतो की विशाल कोळी मोठं जाळं विणत असतो, असं अनेकदा पाहिलं असेल. सिनेमात नाही तर असा सीन प्रत्यक्षात देखील घडला आहे. एका विशाल कोळ्यानं अक्षरश: चादरीसारखं भलमोठं जाळं विणल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून हॅरी पॉटरमध्ये देखील विशाल कोळ्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआय या वृत्तसंस्थेनं कोळ्यानं विणलेल्या जाळ्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिणपूर्व ऑस्ट्रेलियामध्ये मोठं वादळ आणि महापुरानंतरचं हे दृश्यं आहे. विक्टोरिया राज्याचं मोठ्या प्रमाणात महापूर आणि वादळात नुकसान झालं. ही स्थिती पूर्ववत करण्यात सर्वांनाच मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 


अशा परिस्थितीमध्ये एका विशाल कोळ्यानं जाळं विणलं आहे. हे जाळं आहे की भलीमोठी चादर असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून पडत आहे. एकसंध विणलेलं हे जाळं हवेवर हेलकावे खातानाचा ऑस्ट्रेलियातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 




तज्ज्ञांच्या मते कोळ्यांनी विशिष्ट्य उद्देशानं हे जाळं विणलं आहे. हे फुग्यासारखं कोळ्यानं जाळं विणलं आहे. तर तज्ज्ञांच्या मते हे जाळं काढताना कोणताही धोका नाही असंही म्हटलं आहे. वाढणाऱ्या पाण्यापासून वाचण्यासाठी त्यांनी अशाप्रकारे जाळं तयार केल्याचं सांगितलं आहे.