मुंबई : आज लोकांना खूप लवकर राग येतो. अशीच एक घटना लॉस वेगासमध्ये घडली आहे. मॅकडॉनल्डमध्ये दोन महिला जेव्हा भिडल्या तेव्हा त्यांच्यात झालेली हाणामारी पाहून अनेकांना धक्का बसला. हा वाद सुरुवातीला सोडा देण्यावरुन सुरु झाला. आधी या 2 महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांशी भिडल्या. सुपरवायजरने एका महिला कस्टमरची चांगलीच धुलाई केली.


महिलेने कर्मचारीवर फेकलं मिल्कशेक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ नेवादा नावाच्या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे की, "McDonalds मध्ये एका युवतीने रेस्टोरंटच्या कर्मचाऱ्याकडे एक कप पाणी मागितलं. पण सुपरवायजरने सोडा मशीन बंद करत पाणी देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या महिला कस्टमरने रागाच्या भरात सुपरवायजरला शिवी दिली आणि तिच्यावर मिल्कशेक फेकलं.



आईवरुन शिवी दिल्याने सुपरवायजर संतापली


मिल्कशेक फेकल्यानंतर आईवरुन शिवी दिल्याने सुपरवायजरने महिला कस्टमरला मारहाण केली. कमीत कमी या जगात नसलेल्या माझ्या आईला शिवी देऊ नकोस असं सुपरवायजर म्हटलं.