सॅन फ्रान्सिस्को : वस्तल मेहताचा फेसबुकला जाहीरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नात सिंहाचा वाटा आहे.


वस्तल आणि त्याची टिम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2017 च्या तिसऱ्या तिमाहीत फेसबुकला भरगच्च असं 17.37 बिलियन डॉलर्सचं उत्पन्न अमेरिकेत मिळालं आहे. या यशाचं श्रेय फेसबुकने भारतीय मूळ असलेल्या वस्तल मेहता या इंजिनियरला दिलं आहे. वस्तल आणि त्याची टिम फेसबुकवरील जाहिरातीच्या व्यवसायासंबंधीचं तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा सांभाळतात.


जाहिरातींमधलं उत्पन्न


2010 मध्ये जेव्हा या कामाला सुरुवात झाली तेव्हा वस्तल मेहता हा एकटाच या विभागात काम करत होता. आता तो फेसबुकच्या सोल्युशन्स इंजिनियरींग या विभागाचा संचालक म्हणून काम करतो. आता तो आणि त्याची 100 माणसांची टिम फेसबुकला जाहिरातींमधून प्रचंड उत्पन्न मिऴवून देतात.


ग्राहकांशी संवाद


या कामासाठी वस्तल ग्राहकांशी संवाद साधतात. त्यांच्या गरजा ओळखून नवीन अॅप आणि तंत्रज्ञान विकसित करतात. यामुळे जाहिरातीं जास्त प्रभावीपणे लोकांपर्यत पोहोचवता येतात. यामुळे फेसबुकवर जाहिरात करणं अधिक फायदेशीर ठरतं. तर फेसबुकला जाहिरातींमधून प्रचंड उत्पन्न मिळतं.


वाढता पैशांच्या ओघ


येत्या काळात या विभागात अधिक गुंतवणुक करून तिथे नवीन संधीचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न असेल असं मत फेसबुकचे सीओओ शेरील सॅँडबर्ग यांनी व्यक्त केलं. फेसबुकला जाहिरातींमधून 2018 साली 21.57 बिलियन डॉलर्स तर 2019 साली 25.56 बिलियन डॉलर्सचं उत्पन्न अपेक्षित आहे.