मोदींच्या स्वागतासाठी ट्रम्प यांच्या पत्नीने घातला इतका महागडा ड्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रंप यांनी केलं. भेटीनंतर अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. कारण होतं तिचा ड्रेस.
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रंप यांनी केलं. भेटीनंतर अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. कारण होतं तिचा ड्रेस.
मेलानिया हिने पिवळ्या रंगाचा बेल्टेड फ्लोरल प्रिंट गाऊन घातला होता. ज्याची किंमत दीड लाख रुपये होती. दीड लाखाच्या या ड्रेसमुळे ट्विटरवर तिचीच चर्चा होती.
डोनाल्ड ट्रंप यांच्या वक्तव्यामुळे मेलानियासाठी अनेक फॅशन डिजाईर्सने राष्ट्रपतीपदाच्या शपथ ग्रहन कार्यक्रमासाठी ड्रेस डिजाईन करण्यास नकार दिला होता.