महिलांच्या पॅन्टचे खिसे लहान का असतात? कारण आहे खूपच रंजक, जाणून घ्या
Men`s Jeans Pocket are Bigger than Women`s Pocket : आपण नेहमी पाहतो की पुरुषांच्या जीन्सचे पॉकेट हे महिल्यांत्या जीन्सच्या पॉकेटच्या तुलनेनं नेहमी मोठे का असतात? त्याचे नेमके कारण काय आहे ते आता समोर आले आहे. तर ही गोष्ट पंधराव्या शतकापासून सुरु आहे.
Men's Jeans Pocket are Bigger than Women's Pocket : तुम्ही कधी तुमची जीन्स किंवा ट्राउसर ड्रेसच्या खिशाविषयी कधी विचार केला आहे का? त्यात मुलांच्या जीन्सच्या खिश्यांची साईज मुलींच्या जीन्सच्या खिश्या पेक्षा मोठी का असते? आज आपण यामागचं कारण जाणून घेणार आहोत. मुळात प्रश्न हा आहे की जीन्स किंवा पॅन्टमध्ये खिसे महत्त्वाचे का आहेत? जेव्हा प्रश्न काही टेलरना विचारण्यात आला, तेव्हा त्यांचं उत्तर खूपच रोचक आणि मजेदार होत. टेलरनुसार, कोणत्याही कपड्यांमध्ये पॉकेट्स लावायचे कि नाही हे ठरवताना ते कपड्यावर किती चांगलं दिसेल आणि त्याची काय डिझाइन असेल हे लक्षात घेऊन तयार केलं जातं, तर दुसरीकडे कपड्यावर खरोखर पॉकेट गरजेचं आहे की नाही याचा विचार केला जातो
खिशांचा बाबतीत एक मजेशीर गोष्ट देखील आहे. कपड्यांवर खिशाचा वापर 15 व्या शतकापासून सुरु झाला आहे. होय, पंधराव्या शतकापासून पॅन्ट, जीन्समध्ये लहान पाऊचसारख्या साईजमध्ये खिसे जोडले गेले. 18 व्या शतकापासून ड्रेसमध्ये सुद्धा खिसे लावायला सुरुवात केली आणि ड्रेसच्या आत खिसा शिवणे सुरू केले. विशेषत: मात्र पुरुषांसाठी गरज म्हणून खिसाचा वापर केला गेला. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की पुरुषांच्या कपड्यांमध्ये जॅकेट, पँट, शर्टमध्ये खिसे असणे हे पुरुषत्वाशी जोडलेले होते कारण पॅंटच्या खिशाने त्यांच्या पुरुषत्वाची ओळख होऊ लागली, असे म्हटले जात होते.
फॅशन
त्याचसोबत महिलांच्या पॅन्टचे खिसे पॅंटच्या आतच लावण्यात येऊ लागले. इतकंच काय तर त्यांचा आकारदेखील लहान ठेवला गेला होता. मुलींच्या कपड्यांमध्ये खिसे आत ठेवून आकार लहान ठेवण्यात आला तर तर पुरुषांच्या कपड्यांमध्ये फरक ओळखता यावा म्हणून खिसा बाहेर ठेवून आकार मात्र मोठा करण्यात आला. त्याचबरोबर पुरुषांची पँट महिलांच्या पँटपेक्षा वेगळी दिसेल याची काळजी घेण्यात आली.
हेही वाचा : गरम खाताना तुमची जीभ नेहमी भाजते? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय
लाइफस्टाईल
आजचे मोठमोठे कपड्यांचे ब्रॅण्डही महिलांच्या जीन्स, स्कर्टमध्ये पॉकेट ठेवत नाहीत, याचे एक कारण म्हणजे महिलांची शरीरयष्टी चांगली आणि स्लिम दिसून येईल. दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आजही पुरूष पँटच्या खिशात पैसे आणि त्यांना लागणार असलेल्या जीवनावश्यक वस्तू ठेवतात, मात्र स्त्रिया यासाठी त्यांच्यासोबत एक बॅग कॅरी करतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)