मेटाने 24 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. या कर्मचाऱ्यांनी फूड वाऊचरचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी यांच्यावर ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकार लॉस एंजिल्सच्या ऑफिसमध्ये झाल्याचं सांगण्यात येत आहे. काही कर्मचाऱ्यांनी $25 च्या फूड वाऊचरमधून टूथपेस्ट, लाँड्री डिटर्जेंट, स्कॉच टेप आणि दारुचे ग्लास खरेदी केले होते. मेटाने या प्रकरणात चौकशी केल्यावर लक्षात आलं की, सगळे कर्मचारी फूड वाऊचरचा वापर चुकीच्या पद्धतीने करत होते. 


 फूड वाऊचरचा असा वापर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या नियमानुसार, कर्मचारी फक्त ऑफिसच्या वेळेतच जेवण खरेदी करण्यासाठी फूड वाऊचरचा वापर करु शकतात. पण काही कर्मचारी टूथपेस्ट, लाँड्री डिटर्जंट, स्कॉच टेप आणि दारूचे ग्लास यासारखा किराणामालाचा सामान यामधून खरेदी करत होते. काही कर्मचारी जेवणासाठी ऑफिसमधून घरी जात होते तरी देखील ते फूड वाऊचरचा वापर करत होते. अशा 24 कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता. 


4 लाख डॉलर पगार 


मेटाच्या कर्मचाऱ्याने सांगितलं की, त्यांनी फूड वाऊचरचा वापर टूथपेस्ट, लाँड्री डिटर्जंट,  स्कॉच टेप आणि दारूचे ग्लास यासारखे सामान खरेदी केले आहे. या कर्मचाऱ्यांची वर्षाचा पगार हा 400000 डॉलर इतका आहे. एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, तो ऑफिसमध्ये जेवत नव्हता पण तो फूड वाऊचरचा गैरवापर करत होता. 


मेटाने याबाबत चौकशी केल्यावर कर्मचारी फूड वाऊचरचा चुकीचा वापर करत असल्याचं दिसून आलं. कंपनीने कर्मचाऱ्यांना चेतावणी दिली आणि काही कर्मचाऱ्यांना कामावरूनच काढून टाकलं. कारण काही कर्मचाऱ्यांनी अनेकदा फूड वाऊचरचा चुकीचा वापर केला होता. यामधून कळतं की, मेटा कंपनीने नियम मोडणाऱ्या लोकांच्या चुकीकडे दुर्लक्ष केलेले नाही. 


दोन वर्षांत काढले 21 हजार कर्मचारी 


मेटामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कंपनीच्या कामाची पद्धत बदलण्याचा हा एक भाग आहे. मेटा मालक मार्क झुकेरबर्गने कंपनीत बरेच बदल केले आहेत आणि अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. गेल्या दोन वर्षांत, मेटाने अंदाजे 21,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. आता कंपनीत सुमारे 70,799 कर्मचारी आहेत. मेटा आता व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम सारखे विभाग देखील बदलत आहे. अनेक तंत्रज्ञान कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खर्च कमी करत आहेत. याशिवाय कंपन्यांनी फिटनेस क्लासेस आणि ऑफिस सामान यांसारखे अनेक फायदेही कमी केले आहेत. कंपन्यांचे पैसे संपत असल्याने हे सर्व घडत आहे.