meta layoffs mark zuckerberg might fire more employees: फेसबुकची (Facebook) पॅरेंट कंपनी असलेल्या 'मेटा'चे (Meta) सीईओ (CEO) म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मार्क झुकरबर्ग (mark zuckerberg) यांनी मागील वर्षी 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. ट्विटरमधील (Twitter) कर्मचारी कपातीनंतर मेटाने हा मोठा निर्णय घेतला. मात्र अता येणाऱ्या काळामध्ये मार्क झुकरबर्ग पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत असल्याची चिन्हं दिसत आहेत. मागील आठवड्यामधील कर्मचारी कपातीनंतर मार्क झुकरबर्ग यांनी पुन्हा एकदा कपतीचे संकेत दिले आहेत. त्यांनी 2023 हे वर्ष 'एफिशिएन्सी'चं असेल असंही म्हटलं आहे. त्यांनी कंपनीमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना वॉर्निंग दिली आहे.


मार्क झुकरबर्ग नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या एका वृत्तानुसार मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आणि डायरेक्टर्सला प्रत्येकाने कंपनीसाठी काहीतरी योगदान द्यावे नाहीतर कंपनी सोडावे असे दोन पर्याय दिले आहेत. कर्मचारी कपातीचे संकेत देताना मार्क झुकरबर्ग यांनी कपंनी अधिक कार्यक्षम बनवण्याच्या दृष्टीने पुढील वाटचाल असणार आहे असं म्हटलं. नुकत्याच झालेल्या एका मिटींगमध्ये मार्क झुकरबर्ग यांनी मधल्या काही स्तरामधील मॅनेजेरियल टीम्स हटवणार असल्याचं सांगितलं. निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान करण्याची इच्छा असून त्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे असं मार्क झुकरबर्ग म्हणाले. "मला नाही वाटत की तुम्हालाही एक मॅनेजमेंट स्ट्रक्चरची आवश्यकता वाटत आहे. मॅनेजर्सला मॅनेज करणाऱ्या टीमची आपल्याला गरज नाही. ते अशा लोकांना मॅनेज करत आहेत जे आधी पासूनच चांगलं काम करत आहेत," असं मार्क झुकरबर्ग म्हणाले.


झुकरबर्ग काय म्हणाले?


मार्क झुकरबर्ग यांनी आता काही माध्यम स्तरावरील प्रबंधक आणि निर्देशकांना व्यक्तिगत योगदान देण्यास सांगितलं आहे. असं करणं शक्य नसल्यास कंपनी सोडावी असंही झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे. जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याला फ्लाटनिंग असं म्हणतात. म्हणजेच आता मॅनेजर्स आणि डायरेक्टर्स कोडिंगसाठी अन्य कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहणार नाही. त्यांना स्वत:लाच हे सर्व करावं लागणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता लवकरच फेसबुकमध्ये कर्मचारी कपात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


11 हजार लोकांना डच्चू


मार्क झुकरबर्गने जवळजवळ 13 टक्के मेटा कर्मचाऱ्यांना कंपनीमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ही संख्या जवळजवळ 11 हजार इतकी आहे. या कर्मचारी कपातीमुळे प्रत्येक देशातील मोठ्या कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांना डच्चू देण्यात आला.