मेक्सीकोमध्ये मेट्रो रेल्वे जात असताना पूल कोसळल्याने भीषण अपघात
मेक्सिकोमध्ये मेट्रो रेल्वेचा पूल अचानक कोसळल्याने भीषण अपघात
मुंबई : मेक्सिकोमध्ये मेट्रो रेल्वेचा पूल अचानक कोसळल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत 20 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत 70 हून अधिक जण जखमी झाले. मेट्रो ट्रेन पुलावरुन वरून जात असताना हा अपघात झाला. या अपघातामुळे रेल्वेचे डबे पुलावर लटकत होते. यावेळू रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्या देखील रेल्वे डब्यांना धडकल्या. स्थानिक मीडिया आणि इंटरनेट एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. जे अपघाताची भीषणता दाखवते.
मेक्सिकोच्या महापौर क्लाउडिया शिनबॉम म्हणाले की, रेल्वेची बोगी वर लटकलेल्या अवस्थेत असल्याने काही काळ मदतकार्य रखडले होते, अशा वेळी मदत करणे धोकादायक ठरू शकते. नंतर क्रेन पाठवल्यानंतरच मदतकार्य सुरू झाले. बर्याच लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी अपघाताबाबद दुःखद व्यक्त केलं.
ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि जबाबदारीही निश्चित केली जाईल. या मेट्रो लाईन च्या बांधकामावेळी अनियमिततेचे आरोप झाले होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये येथे दोन गाड्यांची टक्कर ही झाली होती, त्यामध्ये एकाचा मृत्यू आणि 41 लोक जखमी झाले होते.