लंडन  : मानवी जीवनात सतत चढ उतार येत असतात सुखाचे आणि दु:खाचे दिवस येत जात असतात. काही लोकांना या संकटाचा सामना करता येतो, काही जण जीवनभर या घटनांचं नको ते नैराश्य कवटाळून बसतात. पण काही लोक यातून उठून पुन्हा नव्याने सुरुवात करतात आणि यापूर्वी होते, त्यापेक्षा जास्त उंची गाठतात. ही कहाणी आपल्या देशातील नसली तरी तुम्हाला प्रेरणा देणारी नक्कीच आहे. ब्रिटनमधील ३० वर्षाची Michaela Morgan मिशेल मॉर्गनसोबत असंच काही घडलं. २०१९ हे वर्ष तिच्यासाठी खूप वाईट ठरलं, divorce तिला तिच्या पतीनं फारकत दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ती पतीपासून वेगळी झाली हे दु:ख तिच्यासाठी खूप मोठं होतं, हे प्रत्येक महिलेसाठी असतं त्याप्रमाणे. पण यानंतर ती काही दिवस निराश होती, पण तिने घरी आरामात बसून असं काम सुरु ठेवलं की, या कामामुळे तिला आता महिन्याला ४१ लाख रुपये मिळतात.



द सन या वृत्तपत्रानुसार ३० वर्षाच्या  Michaela Morgan मिशेल मॉर्गनला तिच्या नवऱ्याने २०१९ साली सोडचिठ्ठी दिली म्हणजेच फारकत दिली. पण दिवस आणखी असा आला की २ आठवड्यात तिच्या आवडत्या कुत्र्याचाही मृत्यू झाला, तो ३ वर्षांचा होता, त्याला कॅन्सर झाला होता, यानंतर ती खूप चिंतेत असायची.



इंग्लंडच्या वेल्सची राहणारी मिशेल मॉर्गन  Michaela Morgan म्हणते तिच्यासाठी नवऱ्याने दिलेली divorce फारकत एवढी क्लेशदायक नव्हती, त्यापेक्षा जास्त त्रास तिला तिच्या कुत्र्याचा मृत्यू झाला ती होती. कारण त्याच्याशी त्याची खूपच मैत्री होती. यानंतर ती खूप निराश आणि चिंतेत होती, ती आठवडाभर तिच्या अंथरुणावर पडून होती, मिशेलसाठी आठवड्यातील हे ३ हफ्के खूपच वाईट होते.



नवऱ्याने दिलेली फारकत आणि कुत्र्याच्या मृत्यूनंतर मिशेल मॉर्गन  Michaela Morgan खूप निराश राहत होती, पण तिने हार मानली नाही, आणि स्वत:ला सांभाळलं. जीवनात अधिक पुढे जाण्यासाठी तिने असं काम केलं की, जग यावर अजूनही विचार करतंय अनेकांसाठी ही प्रेरणा ठरली आहे. ती घरातच अंथरुणावर पडून ४० हजार पाऊंड म्हणजेच ४१ लाख २१ हजार रुपये कमवतेय.



मिशेल मॉर्गनमध्ये  Michaela Morgan एक कला आहे, त्या कलेत ती दरम्यानच्या काळात आणखी पारंगत झाली, एकटेपणात कलेत माणूस किती रमतो आणि काय काय नवनवीन शिकतो हे कलाकारच सांगू शकतो. काही दिवसांचं ट्रेनिंग घेतल्यानंतर तिने डिजिटल आर्टवर्क सुरु केलं, यानंतर तिने काही पैसे स्पेशल इक्विपमेंट खरेदी करण्यास खर्च केले. या गुंतवणुकीनंतर तिने आपला बिझनेस सुरु केला.


मिशेल मॉर्गन  Michaela Morgan म्हणते कोरोना व्हायरसचं संक्रमण सुरु होतं त्या काळात लॉकडाऊनमध्ये ती बेडरुममध्ये आराम करत होती, आणि त्याच दरम्यान ती तिचा बिझनेसही वाढवत होती. मागील वर्षी एप्रिलपासून जुलैपर्यंत तिने आपल्या बिझनेस मिमो आर्टसच्या माध्यमातून १ लाख १७ हजार पाऊंड म्हणजेच १ कोटी २० लाख रुपये कमवले. म्हणजेच एवढ्या किंमतीच्या ऑर्डर्स तिने करुन दिल्या.



मिशेल मॉर्गनच्या  Michaela Morgan कामाची खूप वाह वा होत आहे, जगभरातील टॉप ब्रॅन्डस तिला नोकरी देऊ इच्छितात, पण ती बाहेरुनच अनेक प्रसिद्ध ब्रॅण्डसाठी काम करीत आहे,  Vogue, Prada, Chanel आणि Christian Dior यांचा यात समावेश आहे.