सान्या : 'मिस वर्ल्ड २०१८' स्पर्धेत मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन ही विजेती ठरली. तर थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती ठरली. वेनेसाला 'मिस वर्ल्ड २०१७'ची विजेती मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा मुकुट परिधान केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाची मिस इंडिया तामिळनाडूची अनुकृती वास हिने या स्पर्धेत टॉप ३० मध्ये स्थान मिळवले होते. त्यामुळे भारताच्या आशा होत्या. मात्र अंतिम १२ मध्ये तिला स्थान मिळवता आले नाही.



अंतिम पाच स्पर्धकांमध्ये मिस मेक्सिकोसह मिस थायलंड निकलेन पिशापा, मिस बेलारुस मारिया वासिल्विच, मिस जमायका कादिजा रॉबिन्सन, मिस युगांडा क्वीन अबेनक्यो यांचा समावेश होता. 



मानुषीने वेनेसाला मुकुट घालताना आपल्या मिस वर्ल्डपर्यंतच्या प्रवासातल्या आठवणी जागवल्या. वेनेसाचा जन्म  ७ मार्च १९९२ रोजी झाला. ती पूर्ण-वेळ मॉडेल म्हणून काम करते. ती पहिली मॅक्सिकन तरुणी आहे. मिस वर्ल्ड वेनेसा हिने इंटरनॅशनल बिझनेसचा अभ्यास केला आहे. सध्या ती एका मुलींच्या पुनर्वसन केंद्राच्या संचालक मंडळात आहे.