मुंबई : प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था 'नासा'नं आता थेट सूर्यावरच मोहीम आखलीय. नासाचं यान सूर्याच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. मानवी इतिहासातील ही पहिलीच मोहीम असणार आहे. याआधी कोणतेही मानवनिर्मित यान सूर्याच्या जितक्‍या जवळ गेले नव्हते तितक्‍या जवळ जाऊन या यानातून सूर्याच्या पार्श्‍वभूमीचा अभ्यास केला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्याचा करोना हा त्याच्या पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का, यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न हे यान करणार आहे. सूर्याच्या करोनामधून सौर वादळाची उत्पत्ती होते. त्यामुळे या मिशनला अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मिशन मानलं जातंय.


हे यान दुसऱ्या यानांच्या तुलनेत सूर्याच्या सातपट अधिक जवळ जाणार आहे. 'इजीन पार्कर' या ९० वर्षीय खगोलशास्त्रज्ञाने सौर वादळांसंदर्भात सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या यानाला 'पार्कर सोलर प्रोब' असं नाव देण्यात आलंय. 


नासा आणि जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था यांनी संयुक्तरित्या १९७६ साली हेलिअस-२ नावाचं यान पाठवलं होतं.