मुंबई : मॉडेलिंग हे क्षेत्र ग्लॅमरस असलं तरी त्याकरता अनेक लहान सहन गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. सौंदर्य, कपडे, बॉडी लँग्वेज, अॅटिट्यूड, कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. हे सगळं दिसतं तितकं सोपं नक्कीच नसतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा रॅम्पवर तोल जाऊन पडल्यामुळे किंवा टॉप सरकल्यामुळे अनेक मॉडेल्सच्या फजितीचे किस्से आपण ऐकले असतीलच. प्रेक्षकांच्या आणि कॅमरेच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या असताना अशी फजिती होणं फार वाईट असतं. तुमच्या त्या फजितीमुळे अनेकांच्या मनात तुमच्याविषयी नकारात्मक छाप पडते. परंतु, अनेकदा दक्षता बाळगूनही अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. 


व्हिक्टोरिया सिक्रेट


चीनमधल्या शांघाय येथे पार पडलेल्या ‘व्हिक्टोरिया सिक्रेट’ या जगप्रसिद्ध फॅशन शोमध्येही आंतरराष्ट्रीय मॉडेल मिंग शी हिच्यासोबतही असाच प्रकार घडला. पण तिनं ज्या खुबीनं ही परिस्थिती हाताळली याचं जगभरात कौतुक होत आहे. हा फॅशन शो पाहण्यासाठी जगभरातील फॅशनविश्वातले जवळपास १८ हजारांहून अधिक लोक शांघायला जमले होते. या शोसाठी मिंग मॉडेलिंग करत होती. रॅम्पवरून चालत येत असताना मिंगचा उंच टाचांमुळे तोल गेला आणि ती रॅम्पवर पडली. पण तिने काही सेकंदात स्वत:ला सांभाळलं. इतर मॉडेलसारखं रॅम्पवर न रडता किंवा चेहऱ्यावरचे हावभाव अजिबात न बदलता ती सर्वांसमोर स्वत:च्या वेंधळेपणावर हसली, स्वत:ला सावरत उठली आणि कॅमेरासमोर पोज देण्यास सज्ज झाली. तिचा तो आत्मविश्वास पाहून सगळेच प्रभावित झाले आणि तिचं कौतुकही केलं.


नवा पायंडा


अनेकदा असे प्रसंग कसे हाताळावे हे मॉडेल्सना कळत नाही आणि त्या खट्टू होतात आणि त्यांचं संकोचलेपण चेहऱ्यावर दिसू लागतं. त्या सगळ्यावर मात करत तिने जगातील इतर मॉडेल्सना नवा पायंडा घालून दिला.