अमेरिका कोणत्या भारतीयाच्या तालावर थिरकतेय माहितीये? US च्या मुख्य सचिवांचा मोदींसमोरच खुलासा
Modi In US : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना अनेक बड्या नेत्यांची आणि अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही मान्यवरांची भेट घेतली. यादरम्यान सुरेख संवादामुळं त्यांचा हा दौरा विशेष चर्चेत राहिला...
Modi In US : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असतानात त्यांनी तेथील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि राजदुतांची भेट घेतली. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी, अमेरिकेच्या First Lady जिल बायडेन यांनी त्यांच्यासाठी खास State Dinner चंही आयोजन केलं होतं. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. ज्यानंतर शुक्रवारी मोदींनी अमेरिकेच्या उप राष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र मंत्री एँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या निमित्तानं एका भोजन कार्यक्रमाचंही आयोदन करण्यात आलं होतं. यादरम्यानच संवाद साधताना ब्लिंकन यांच्या एका वक्तव्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी एका भारतीय गायकाला उल्लेख करत अमेरिकन नागरिक त्याच्या गाण्यावर थिरकत असल्याचं दिलखुलासपणे सांगितलं.
कोण आहे तो गायक?
सदर कार्यक्रमाला हजेरी असणाऱ्या उपस्थितांना संबोधित करताना ब्लिंकन म्हणाले, 'USA मध्ये भारत जणू आमच्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. आम्ही मिंडी कलिंगच्या विनोदांवर हसतो आणि कोचेलामध्ये दिलजीत दोसांजच्या गाण्यांवर थिरकतो'. तिथं ब्लिंकन यांनी दिलजीतच्या नावाचा उल्लेख करताच इथं सोशल मीडियावर त्याच्या नावाचीच चर्चा सुरु झाली. स्वप्न भारताचं असो किंवा अमेरिकेचं आम्ही सगळेच मिळणाऱ्या संधीवर विश्वास ठेवतो असं ते म्हणाले.
हेसुद्धा वाचा : दबक्या पावलांनी आला... पुतिन यांचा निकटवर्तीय ते बंडखोर; Yevgeny Prigozhin आहेत तरी कोण?
दोन्ही देशांच्या महत्त्वाकांक्षी भूमिकांना केंद्रस्थानी घेत आम्ही कुठून आलोय, कोण आहोत याचा फारसा फरक पडत नसून आपण आपल्यातच काहीतरी नवं घडवू शकतो असं म्हणत त्यांनी भारत आणि अमेरिकेच्या आशावादी भूमिकेकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं.
आता पुन्हा एकदा दिलजीत दोसांजविषयी सांगावं तर, मुळच्या पंजाबच्या चित्रपटसृष्टीतून या कलाकारानं प्रसिद्धी मिळवण्यास सुरुवात केली. गुरुद्वारांमध्ये किर्तन करताकरता पुढं तो आपली नवी गायनशैली प्रकाशझोतात आणताना दिसला. पंजाबमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या कलाकारांपैकी एक असणाऱ्या दिलजीतनं 'उडता पंजाब' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पाहता पाहता देशविदेशात त्याची लोकप्रियता वाढली. अभिनय आणि गायन क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारा हाच दिवजीत त्याच्या साध्या राहणीमानासोबतच मनमिळाऊ स्वभावामुळंही चाहत्यांच्या मनाचा ठाव घेताना दिसतो. त्यामुळं थेट अमेरिकेत त्याच्याविषयी असणारं प्रेम आणि वेड पाहता अप्रूप वाटायला नको.