नवी दिल्ली : जगात कोरोनाने कहर केला आहे. भारतातही कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत आहे. त्याच बरोबर, कोरोनाचे एक लाखाहून अधिक संक्रमित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीतही भारत सामील झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 139 वर गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात आता कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. सध्या जगातील 11 देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक आहेत. भारतही त्या देशांमध्ये सामील झाला आहे.


भारत हा जगातील 11 वा देश आहे जिथे कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 


या 10 देशात लाखो रुग्ण 


कोरोना विषाणूच्या बाबतीत, 15 लाखाहून अधिक रुग्णांसह अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. यानंतर 2.90 लाखांपेक्षा जास्त रुग्ण रशियात आहेत. तिसर्‍या क्रमांकावर स्पेन आहे, जेथे 2.78 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहे. ब्रिटनमध्ये 2.46 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये 2.45 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.


इटली सहाव्या क्रमांकावर असून येथे 2.2 लाखाहून अधिक रुग्ण आहेत. त्याखालोखाल फ्रान्सचा सातवा क्रमांक आहे, जेथे 1.79 लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. आठव्या क्रमांकावर जर्मनी 1.77 लाख, नवव्या क्रमांकावर तुर्की 1.50 लाख तर इराण 1.22 लाख रुग्णांसह दहाव्या क्रमांकावर आहे. 


जगात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत जगात 48 लाखाहूनही अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय जगात कोरोनामुळे तीन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.