अमेरिका :अमेरिकेमध्ये 92 वर्षीय आईने राहत्या घरी स्वतःच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मुलाचा आईला वृद्धाश्रमामध्ये टाकण्याचा प्लॅन उधळण्यासाठी तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. 


कसा घडला हा प्रकार ?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

72 वर्षीय थॉमस ब्लेसिंग या व्यक्तीचा राहत्या घरात आईने मानेजवळ गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांना जेव्हा या गोष्टींची खबर मिळाली तेव्हा ते ब्लेसिंग कुटुंबियांच्या घरी पोहचले. 
मास्टर बेडरूममध्ये थॉमस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना दिसला. तर आई अ‍ॅना तिच्या खोलीत आरामखूर्चीवर बसली होती. आरामखूर्चीत बसलेली अ‍ॅना, ' तू माझं आयुष्य घेतलं म्हणून मी तुझं घेतेयं..' असे पुटपुटत होती. 


माय-लेकात भांडण 


अ‍ॅना मास्टररूमध्ये आल्यानंतर माय-लेकामध्ये भांडण  झाल्याचे थॉमसच्या गर्लफ्रेंडने पोलिसांना सांगितले. आपल्याला मिळत असलेल्या वागणूकीला कंटाळून मुलाला मुलावर गोळीबार करत असल्याचे सांगितले. मुलाच्या हत्येनंतर अ‍ॅना स्वतःवरही गोळीबार करणार होती. मात्र थॉमसच्या गर्लफ्रेंडने त्यांच्या हातातून शस्त्र दूर केल्याने अ‍ॅनाचा आत्महत्येचा प्रयत्न टळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.