आर्श्चयच! भावंड जुळीच, पण जन्म मात्र दोन वेगळ्या वर्षात
आईने जन्म दिला जुळ्यांना पण मग हे काय घडलं?
मुंबई : आईने जुळ्यांना जन्म दिला पण तो ही भिन्न वर्षात. काय आहे ही अजब गोष्ट.. जन्म एकाच आईच्यापोटी फरक फक्त 15 मिनिटांचा पण जन्म मात्र दोन वेगवेगळ्या वर्षात. कुठे घडलाय हा अजब प्रकार? शंभरात फक्त 3 टक्के अशा घटनेची शक्यता असते. या बाळांच्या जन्माने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका आईने जुळ्यांना जन्म दिला पण तो दोन वेगवेगळ्या वर्षात. ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. दोन जुळ्यांचा जन्म अशापद्धतीने पहिल्यांदाच झाला असेल.
नवीन वर्ष सुरू होण्याच्या 15 मिनिटं अगोदर मुलाचा जन्म
people च्या बातमीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी नवीन वर्ष येण्यापूर्वी रात्री 11.45 वाजता फातिमा माद्रिगल आणि रॉबर्ट रुजिलो यांना मुलगा झाला. त्याला अल्फ्रेडो असे नाव देण्यात आले.
बरोबर 12 वाजता मुलीचा जन्म
सर्वजण पहिल्या मुलाचा आनंद साजरा करत होते. तोपर्यंत रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी या जोडप्याला मुलगी झाली. तोपर्यंत नवीन वर्ष सुरू झाले होते. मुलीचे नाव आयलीन होते.
या योगायोगाने आई आणि वडील दोघांनाही आश्चर्य वाटले की त्यांच्या जुळ्या मुलांचे वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातील आणि त्यांच्या वयात एक वर्षाचे अंतर असेल.
जुळ्यांसोबतच त्यांच्या जन्माची अनोखी कहाणी
या संदर्भात नेटिव्हीड मेडिकल सेंटरने सांगितले की, त्यांच्या मुलांचा वाढदिवस अनोखा असल्याच्या योगायोगाने त्यांचे वडील खूप उत्साहित आहेत.
अशा संयोगाची शक्यता फक्त 3 टक्केच
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, अमेरिकेत दरवर्षी सुमारे एक लाख २० हजार जुळी मुले जन्माला येतात. परंतु असा योगायोग फक्त ३ टक्केच राहतो.