श्रीलंकेत काश्मीर मुद्दा उचलताच भारतीय खासदारांनी पाकच्या खासदारांना सुनावलं
पाहा काय बोलले काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई
कोलंबो : श्रीलंकेतील यूनिसेफच्या एका परिषदेमध्ये पाकिस्ताननं काश्मीर मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करताच भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळानं त्यांना जोरदार प्रत्यूत्तर दिलं. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आणि भाजपाच्या संजय जैसवाल यांनी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे दावे पूर्णपणे खोडून काढले. खासदार गौरव गोगोई यांनी केवळ प्रत्यूत्तर दिलं नाही तर पाकिस्तानमधील कायदा आणि अल्पसंख्यांवरील अत्याचाराबाबतही त्यांना खडे बोल सुनावले.
काश्मीर मुद्द्यावर सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि काश्मीर जनतेचा आवाज ऐकला जाईल. मात्र कोणा तिसऱ्या देशाला या मुद्द्यावर बोलण्याचा काही अधिकार नसल्याचं सुनावलं. पाकिस्ताननं आधी आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करावं असंही भारतीय खासदरांनी पाकिस्तानी शिष्टमंडळाला सुनावलं.
पाकिस्तान भारताची कोंडी करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. पण त्यात पाकिस्तानला कोणतंच यश मिळत नाही आहे. याआधी मालदीवच्या संसदेत देखील काश्मीर मुद्दा उचलताच राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी त्यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर कोलंबोमध्ये देखील यूनिसेफच्या दक्षिण एशियन पार्लियामेंट्री कॉन्फ्रेंसमध्ये पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उचलवण्याचा प्रयत्न केला.