Mukesh Ambani Sells 2BHK Apartment: रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचं मुंबईमधील घर म्हणजेच अँटिलिया या घराची किंमत 15 हजार कोटी रुपये इतकी आहे. या घरामध्ये मुकेश अंबानी हे त्यांची पत्नी निती अंबानी, मुलगा अनंत अंबानी, आकाश अंबानी आणि मुलगी श्लोका मेहता-अंबानी यांच्याबरोबरच नातवडांसहीत या आलिशान घरात राहतात. मुकेश अंबानींची संपत्ती जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. त्यांनी अनेक देशांत स्थावर मालमत्ता घेतली आहे. 'न्यू यॉर्क पोस्ट'मधील वृत्तावुसार मुकेश अंबांनींनी त्यांचं अमेरिकेतील घर विकलं आहे.


काय आहे या घरात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानींनी न्यू यॉर्कमधील मॅनहॅटन येथील आपलं घर विकलं आहे. या घराचा सौदा 9 मिलियन अमेरिकी डॉलर्सला म्हणजे भारतीय चलनानुसार 74.53 कोटींना विकलं आहे. न्यू यॉर्कमधील 'सुपिरीअर लिंक' नावाने प्रसिद्ध असलेल्या 12th स्ट्रीटवरील '400 डब्ल्यू' या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मुकेश अंबानींची ही संपत्ती होती. या घराचा एरिया 2,406 स्वेअर फूट इतका आहे. या घरामध्ये 3 बाथरुम आहेत. या घरामधून न्यू यॉर्क शहरातून वाहणाऱ्या जगप्रसिद्ध ह्यूडसन नदीचं दृष्य पहायला मिळतं. या घराची फ्लोअर टू सिलिंग उंची 10 फूट आहे. नॉइज प्रूफ खिडक्या, किचन आणि लाकडापासून बनवलेलं फ्लोअर अशी घराची रचना आहे. 


1919 उभारलेली इमारत


ज्या '400 डब्ल्यू' नावाच्या इमारतीमध्ये हे घर आहे ती 1919 साली उभारलेली आहे. पूर्वी या इमारतीला 'सुपिरीअर लिंक फॅक्ट्री' नावाने ओळखलं जायचं. 2009 साली या इमारतीची पुन:रचना करण्यात आली. या घरामध्ये योग रुम, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा, लाऊंज आणि व्हॅलेट पार्किंगसारख्या सोयी देण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये या इमारतीमध्ये अनेक नामांकित व्यक्तींचं वास्तव्य राहिलं आहे. यामध्ये मार्क शटलरवर्थ, लेस्ली अॅलेकझँडर, मार्क जेकोबसारख्या लोकांचा समावेश आहे.


900 कोटींच्या हॉटेलचे मालक


अँटिलिया आणि न्यू यॉर्कमधील या घराबरोबरच युनायटेड किंग्डमधील लंडनमध्येही 900 वर्षांपूर्वीचं एका हॉटेलची मालकी मुकेस अंबानींकडे आहे. त्यांनी हे हॉटेल 2020 मध्ये 57 मिलियन पौंडला विकत घेतलं होतं. भारतीय चलनानुसार ही किंमत 529 कोटी रुपये इतकी होते. हे हॉटेल स्टोक पार्कमध्ये आहे. हे हॉटेल 1760 साली उभारण्यात आलं असून यामध्ये अनेक लक्झरी सेवा पुरवण्यात आल्या आहेत. या हॉटेलमध्ये 49 लक्झरी रुम्स आणि 3 रेस्तराँ आहेत.