मुंबई : मुंबईत ९ वर्षांपूर्वी झालेल्या २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईद याची नजरकैदेतून सुटका होणार आहे.


नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी पाकिस्तानमधील एका न्यायालयाने हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या नजरकैदेत वाढ करण्यात यावी अशी पाक सरकारची मागणी फेटाळून लावल्याने हाफिज सईद याची गुरुवारी सुटका होणार आहे.


पाकचा ना'पाक' चेहरा समोर


भारतानेही हाफिज सईद याच्या दहशतवादी कृत्याबाबत सबळ पुरावे दिले होते. मात्र, तरीही हाफीज सईद मोकाट सुटल्याने पाकिस्तान सरकारचा ना'पाक' चेहरा समोर आला आहे.


जानेवारी २०१७मध्ये नजरकैदेत


दहशतवादाविरोधात कठोर आणि आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेत अमेरिकेने जमात- उद- दवाविरोधात कारवाई न झाल्यास निर्बंध लादले जातील, असं पाकिस्तानला ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये हाफिझ सईद आणि त्याच्या साथीदारांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं.


पाकिस्तान सरकारला पुरावे देण्यास अपयश


सईदच्या नजरकैदेत वाढ करण्यात यावी अशी मागणी करत न्यायालयात पुरावे देण्यास पाकिस्तान सरकारला अपयश आलं. त्यानंतर न्यायालयाने हाफिज सईदची सुटका करण्याचे आदेश दिलेत.