मुंबई : संशोधक 2000 वर्ष जुन्या रहस्यमय ममीवर मोठ्या जोमाने संशोधन करत आहेत. ही सगळ्यात जुनी आणि पहिली गर्भवती महिला ममी आहे. त्यामुळे संशोधक ही मृत्यूपासून अनेक रहस्य शोधण्याचे काम करत आहे. या पुरातन ममीबद्दल मोठा गौप्यस्फोट झाला आहे. जेव्हा त्या महिलेचा मृत्यू झाला त्यानंतरही तिच्या गर्भातील भ्रूण जिंवत होतं, असा दावा संशोधकांनी केला आहे.


मृत्यूनंतरही गर्भातील भ्रूण कसं जिंवत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जानेवारी महिन्यात या रहस्यमय ममीचं सीटी स्कॅन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये ही महिला गर्भवती असल्याचं समजलं. विशेष गोष्ट म्हणजे या महिलेच्या मृत्यूनंतरही हे भ्रूण जिंवत होते. ममीच्या गर्भात अत्यंत अॅसिडीट होते आणि कमी प्रमाणात ऑक्सिजन होतं. या वातावरणामुळे गर्भ सुरक्षित असल्याचा अंदाज या संशोधकांनी व्यक्त केला आहे.




कसा झाला 'या' महिलेचा मृत्यू?



संशोधकांनी या महिलेच्या मृत्यूचे कारणही शोधून काढले आहे. संशोधकांनी या ममीच्या कवटीचा अभ्यास केला. या अभ्यासात या महिलेचा मृत्यू कर्करोगामुळे झाल्याचा अंदाज या संशोधकांनी लावला आहे.


सीटी स्कॅनमध्ये कवटीच्या डाव्या बाजूला काही खुणा दिसून आल्यात. या खुणा सहसा नासोफरीन्जियल कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिसून येतात. हा एक दुर्मिळ असा कर्करोग आहे. जो नाक आणि घशाच्या भागामध्ये होतो.


का म्हणतात हिला 'मिस्टिरियस ममी'?



19व्या आणि 20व्या शतकात ही ममी पुरुष पुजाऱ्याची असल्याचं मानलं जात होतं. मात्र वॉर्सा ममी प्रकल्पाअंतर्गत यावर संशोधन करण्यात आलं. तेव्हा ही महिलेची असल्याचं कळलं. या संशोधनात अजून अनेक रहस्यमय गोष्टी बाहेर आल्यात. या ममीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही जगातील पहिली गर्भवती ममी आहे.