Crime News UK : घृणास्पद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीची निघृणपणे हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 200 तुकडे करून काही नदीत तर काही शहराच्या वेगवेगळ्या भागात फेकले. एवढंच नाही तर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने गुगलची मदत घेतली. पोलीस त्याला काय प्रश्न विचारतील याची यादी काढली. जसं की पत्नीशी नातं कसं होतं, ते शेवटचे कधी बोलले या प्रश्नांची उत्तरं त्याने गुगलवर शोधली. (murder husband nicholas metson of wife holly bramley 200 pieces of the body misleading uk police with the help of Google)


1 वर्षांपर्यंत पोलिसांची केली दिशाभूल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा धक्कादायक प्रकार इंग्लंडमध्ये घडल्याच समोर आलंय. 28 वर्षीय निकोलस मॅटसनचं 26 वर्षीय होली ब्रॅमलीशी लग्न केलं होतं. 2023 मधील होळीमध्ये होली ब्रॅमलीला तिच्या मित्र आणि कुटुंबीयांना शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर ती कुठे गायब झाली हे कोणालाही कळलं नाही. 


बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नाच्या दोन वर्षांनी मार्च 2023 मध्ये पती निकोलसने पत्नी हॉलीची हत्या केल्याची कबुली दिली. हत्येच्या वेळी ते घटस्फोट घेणार होते अशी माहिती समोर आली असली तरी या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. 


पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने घेतली गुगलची मदत 


आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी गुगलची मदत घेतली. पत्नी गायब झाल्याचा बनान त्याने केला होता. पोलिसांचा पहिला संशय हा त्याचावर जाईल हे माहिती होतं. शिवाय सर्वात प्रथम पोलीस प्रश्नांचा भेडमारही त्याच्यावर करेल म्हणून त्याने त्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी गूगल सर्चची मदत घेतली.  गुगल सर्च रेकॉर्डवरून पोलिसांना असं दिसून आलं की, त्याने वारंवार गुगलवर अनेक प्रश्न विचारले आहेत. हत्येसंबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत. पोलिसांना दिल्या कबुली जबाबमध्ये त्यांनी पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे नदी आणि शहरातील वेगवेगळ्या भागात फेकल्याचं सांगितलं. दरम्यान मृत महिलेच्या आईने पोलिसांना माहिती दिली की, त्यांची मुलगी आणि जावई यांच्यात पैशांवरून वाद सुरु होता.