नवी दिल्ली : आता एक संतापजनक बातमी आहे. सोशल मीडियावर अनेक ट्रेण्ड व्हायरल होत असतात पण या अजब ट्रेण्डमुळे सध्या संताप व्यक्त होत आहे. मुस्लीम महिलांच्या अनबॉक्सिंचा एक विकृत ट्रेंड सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या विकृतीविरोधात जगभरातून संतापाची लाट उसळली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनबॉक्सिंगचा हा नेमका प्रकार आहे तरी काय? 
वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अनबॉक्सिंग बाय हसबंड.. असं कॅप्शन देऊन शेअर केले जात आहेत. सध्या सोशल मीडियात असे अनेक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहेत. त्यामुळे जगभरातील मुस्लिम समुदायात खळबळ उडाली. 



या व्हिडीओत लग्नाच्या पहिल्या रात्री पती आपल्या पत्नीला आरशासमोर उभं करून तिचा साजशृंगार उतरवत आहे. अगदी एखादा बॉक्स उघडावा तशीच ही कृती असल्याचं निर्लज्जपणे सांगत त्याला अनबॉक्सिंह बाय हसबंड असं नाव काही विकृत नवविवाहित पुरूषांनी दिलं आहे. 


 


मलेशियात हा विकृत ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र त्यामुळे मुस्लिम धर्मगुरूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही प्रथा तात्काळ बंद करण्याची मागणी मुस्लीम समाजातून होत आहे. 


या व्हिडीओतून महिलांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न पुन्हा एकादा समोर आला आहे. असं एखाद्या महिलेला आरशासमोर उभं करून तिचा साजशृंगार उतरवणं आणि ते व्हायरल करणं, ही विकृती नव्हे तर काय ? असे व्हिडीओ व्हायरल करून नवा ट्रेंड रूजवण्याचा प्रयत्न मलेशियात सुरू झाला. 


या कुप्रथेमुळे महिलांच्या आत्मसन्मानावरच घाला घातला गेलाय. स्त्री मग ती कोणत्याही धर्माची असो...ती कुणी वस्तू नाही, तिचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही आणि अशा विकृतीमुळे माणुसकीची लक्तरं वेशीला टांगले जाणार नाही याचंही भान नेटीझन्सनी बाळगायला हवं.