`माझे आतापर्यंत ४ हजार बायकांशी संबंध`, असं सांगताच ...अब्जाधीश उद्योजकाच्या बायकोने लगेच त्याला ``शून्य`` केलं
जापानच्या अरबपती उद्योजकाच्या तरूण पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.
नवी दिल्ली : जापानच्या अरबपती उद्योजकाच्या तरूण पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. 25 वर्षीय साकी सुडोवर 77 वर्षीय पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार साकीने लग्नानंतर तीन महिन्यातचं पती डॉन जुआनची हत्या केली आहे. डॉन जुआन उर्फ कोसुके नोजाकी जापानचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. नोजाकी यांचा रियल इस्टेट आणि दारूचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी मे महिन्यात त्यांची हत्या झाली. तेव्हा त्यांच्या शरीरात घातक पदार्थ असल्याचं समोर आलं.
'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार हत्येपूर्वी ते त्यांच्या पत्नीसोबत होते. नोजाकी सर्वप्रथम 2016साली चर्चेत आले. तेव्हा त्यांनी स्वतःची ऑटोबायोग्राफी प्रसिद्ध केली होती. ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी चार हजार महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केला असून त्यांना लाख-कोटी रूपये दिल्याचं देखील सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आहे.
पोलिसांच्या तपासणीनंतर त्यांना विष देवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृत्यू पूर्वी ते त्यांच्या पत्नीसोबत होते असं देखील सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सुडोने इंटरनेटवर विषारी ड्रग्सबद्दल सर्च केलं होतं. अद्यापही सुडोने तिच्या पतीला का मारलं असावं? याची खातर जमा झोलेली नाही.
शहराच्या प्रगतीसाठी त्यांना त्यांची 1.3 बिलियन युआनची संपत्ती दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवाय सुंदर महिलांना डेट करणं हा त्यांचा मुख्य हेतू असल्याचं देखील त्यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिलं आहे. स्थानिक मीडियानुसार सुडो आणि नोजाकी यांच्या नात्याबद्दल तिच्या कुटुंबाला काही कल्पना नव्हती. तिने घरच्यांना स्टॉक ट्रेडिंगमध्ये काम करत असल्यामुळे चांगले पैसे कमवत आहे. असं देखील सांगितलं आहे.