मुंबई : जगात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी खूप भीतीदायक तसेच धोकादायक आहेत. जिथे जाण्याचा विचार न केलेलंच बरं. परंतु आपल्यामध्ये असे काही लोक आहेत, त्यांना अशा सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची फार इच्छा असते. चला तर जाणून घेऊ अशा जगातील विचित्र प्रकाराबद्दल. ख्रिश्चनांसह, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला असे वाटते की, त्याने एकदा व्हॅटिकन सिटीला भेट दिली पाहिजे. हा छोटासा देश धर्मिक गोष्टींसोबतच सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात कला, अविश्वसनीय वास्तुकला आणि स्वतःचा इतिहास आहे, परंतु पवित्र शहरातील एक खास ठिकाण पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद आहे. हे ठिकाण म्हणजे 'व्हॅटिकन सिक्रेट आर्काइव्ह्ज'. हे जगातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे.


ज्यामध्ये पोपसाठी प्राचीन पुस्तके आणि ग्रंथ आहेत. या ठिकाणाबद्दल लोकांचा असा विश्वास आहे की, या लायब्ररीमध्ये अशी पुस्तके आहेत, ज्यामध्ये एलियन्सच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.


पहिल्या दृष्टीक्षेपात मेझगोरी हे रशियन शहरासारखे दिसू शकते, परंतु यामुळे तुम्ही या ठिकाणी येण्याची चूक करु नका. कारण मेझगोरी हे बंद शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे फक्त काही मोजक्याच लोकांना येण्याची परवानगी दिली जाते.



कारण येथे जर तुम्ही विनानिमंत्रित प्रवास करण्याचे ठरवले किंवा भेट देण्याचे ठरवले तर तुम्हाला थेट मृत्यूला सामोरे जावे लागेल. काहींचा असा विश्वास आहे की शहरातील रहिवासी यामांताऊ पर्वताच्या आसपास एका गुप्त अणुप्रकल्पावर काम करत आहेत.


यूएस मधील क्षेत्र 51 हे जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे आणि निश्चितपणे सर्वात प्रतिबंधित ठिकाणांपैकी एक आहे. काहींचा असा विश्वास आहे की येथेच सरकार एलियन प्रेत, यूएफओ आणि अपघाताच्या ठिकाणांहून अलौकिक अवशेष लपवत आहे.



माजी कर्मचारी बॉब लाझर यांनी 1989 मध्ये दावा केला होता की त्यांनी पापूज तलावाजवळ पापूज रेंजच्या आत भूमिगत असलेल्या क्षेत्र 51 च्या 'सेक्टर चार' मध्ये काम केले होते. त्याने असा दावा केला की, त्याला एलियन स्पेसक्राफ्टसोबत काम करण्याचे कंत्राट देण्यात आले होते, जे सरकारकडे होते.