न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टनमध्ये नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी यांच्या आगमनापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. 'भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. भारताचा उल्लेख 'खरा मित्र' असं करत धोरणात्मक विषयांवर चर्चा करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलंय.


 नरेंद्र मोदी यांचं आगमन झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी विमानतळाबाहेर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनीदेखील गर्दी केली होती. तर मोदींचे आगमन होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत खरा मित्र असल्याचं वक्तव्य केलं आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चा करु असे म्हटले आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणानुसार मोदी हे अमेरिकेला भेट देत आहेत. ट्रम्प तसेच अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मोदी चर्चा करणार आहेत. शनिवारी रात्री मोदी पोर्तुगालवरुन अमेरिकेत दाखल झाले. 


वॉशिंग्टन विमानतळावर मोदींचे स्वागत झाले. विमानतळाबाहेर मोदींना बघण्यासाठी भारतीय वंशाच्या नागरिकांनी गर्दी केली होती. 'मोदी मोदी' अशा घोषणा करत स्थानिकांनी भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत केले.