Space News: भविष्यात पृथ्वीवर कोणतं संकट आलं, किंवा अॅस्टेरॉईड हल्ला झाला, तर त्यापासून वाचण्यासाठीचा मार्ग सापडला आहे. (Nasa) नासाकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली. प्लॅनेटरी डिफेंस टेस्ट (Planetary Defense Test) म्हणजेच डार्ट मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात पृथ्वीला सर्वाधिक धोका Asteriod पासूनचत असल्यामुळं नासाकडून ही मोहिम हाती घेण्यात आली होती. (NASA DART Mission Asteriod Attack Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 सप्टेंबरला सकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास अॅस्टेरॉईड डिडिमोसच्या (Moon) चंद्राप्रमाणं भासणाऱ्या दगडवजा गोष्टीशी म्हणजे डायमॉरफसशी डार्ट मिशनची टक्कर झाली आणि तिथंच ही मोहीम फत्ते झाली  (Double Asteriod Redirection Test-DART). 


पृथ्वीला वाचवण्याची नासाची मोहीम यशस्वी झालीय...नासाने डार्क यानाच्या धडकेतून लघुग्रहाची दिशा बदलली. यामुळे पृथ्वीवरील महासंकट दूर झालं आहे. ही मोहीम फत्ते करून नासाने मोठा इतिहास रचला हे सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे. 


अधिक वाचा : बाबो... 1300 वर्षांपूर्वीचा खजिना जगासमोर, पाहा कसं दिसतं अस्सल सोनं


सोप्या भाषेत सांगावं तर...
नासाच्या अवकाश यानाने पृथ्वीवर येऊन धडकणाऱ्या लघुग्रहाच्या ठिकऱ्या उडवल्या. डायमॉरफस या लघुग्रहाचा वेध नासाच्या डार्टप्रोबने घेतला. या प्रक्रियेत नासाचं यानही नष्ट झालं. ज्यावेळी ही टक्कर झाली तेव्हा डार्टप्रोबचा वेग 22,530 किलोमीटर प्रति तास इतका होता. 


सध्याच्या घडीला डिइमॉरफोस () एका दिशेनं झुकलं, पण ती दिशा कोणती हे मात्र सविस्तर माहिती अहवालातूनच समोर येणार आहे. ही गोष्ट इतकी रंजक असण्यामागचं कारण म्हणजे 1998 मध्ये 'आर्मागेडन' हा चित्रपटही साधारण अशाच कथानकावर साकारण्यात आला होता. एखादी काल्पनिक कथा सत्यात उतरताना पाहून तज्ज्ञही हैराण झाले.