NASA New Discovery : जागतिक स्तरावर विविध देशांच्या विविध अंतराळ संशोधन संस्था अनेकविध मार्गांनी अवकाश आणि त्याच्याशी संबंधित कैक संकल्पनांचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळालं आहे. नासा असो किंवा इस्रो, प्रत्येक संस्थेनं या क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलेलं असतानाच आता विज्ञानालाच हैराण करणाऱ्या एका संशोधनानं सर्वांनाच हैराण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 डिसेंबर 2023 रोजी बेन्नू उल्कापिंडातून परतलेल्या नासाच्या ओसाइरिस रेक्स यानाच्या नमुन्यांमधून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून या उल्कापिंडामध्ये मानवी अस्तित्व असल्याचं आढळून आलं आहे. इतकंच नव्हे, तर या उल्कापिंडावर बऱ्याच प्रमाणात कार्बन आणि पाण्याचाही अंश आढळला आहे. निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार DNA आणि RNA च्या पाच न्यूक्लिओबेसेस आणि प्रोटीनमध्ये आढळणाऱ्या 20 अमिनो अॅसिडपैकी 14 नमुने असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं पृथ्वीवर असणारी मानवप्रजाती एलियनच आहे का? हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. 
इतकंच नव्हे, तर मानवी अस्तित्वाची उत्पत्ती एका उल्कापिंडातूनच झाली आहे का? हा प्रश्नही इथं उपस्थित केला जात आहे. 


नासाच्या यानानं 1650 फूट रुंद असणाऱ्या एका उल्कापिंडाचा नमुना पृथ्वीवर पाठवला. ज्याच्या परीक्षणानंतर पहिला अहवाल जारी करण्यात आला आहे. नेचर अॅस्ट्रोनॉमीनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नासामध्ये अॅस्ट्रोबायोलॉजिस्टपदी असणाऱ्या डॅनिअल जेल्विन यांनी अहवालातून समोर आलेली माहिती हैराण करणारी असल्याचं सांगितलं. जीवसृष्टीच्या अगदीच प्रारंभित तत्वांचा उलगडा या नमुन्यातून होत असून, या संपूर्ण उल्कापिंडावर नजाणो किती मोठ्या संख्येनं जीवसृष्टी अस्तित्वात असेल यासंदर्भात संशोधकांनीही आश्चर्याची भावना व्यक्त केली. 


हेसुद्धा वाचा : Budget 2025 : भारताचा पहिला अर्थसंकल्प फक्त 197 कोटींचा, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत काय होती?



159 वर्षांनंतर पुन्हाच हाच उल्कापिंड पृथ्वीवर आदळणार 


संशोधकांनी आणखी सविस्तररित्या दिलेल्या माहितीनुसार 159 वर्षांनंतर म्हणजेच 24 सप्टेंबर 2182 मध्ये हाच उल्चापिंड पृथ्वीवर आदळू शकतो. या क्रियेमुळं 22 अणूबॉम्बच्या स्फोटाइतका मोठा स्फोट होऊन विध्वंस होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.