नवी दिल्ली : मंगळवारी नासाला NASA इस्रोच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा चांद्रयान २ या मोहिमेतील विक्रम लँडरचा शोध लागला. चंद्रावरील विक्रम लँडरचे अवशेष आणि त्यामुळे उमटलेले परिणाम यांचे फोटो NASAकडून सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयीची माहिती देण्यात आली. ७ सप्टेंबरला लँड होण्याआधी काही क्षणांपूर्वीच विक्रम लँडरचा इस्त्रोशी त्याचा संपर्क तुटला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासाने 'चांद्रयान २'च्या विक्रम लँडरच्या अवशेषांचे फोटो पोस्ट करत लिहिलं, 'आमच्या नासामून या मोहिमेदरम्यान Chandrayaan2 चा विक्रम लँडर Vikram lander सापडला आहे.' हे फोटो आणि मोहिमेविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती जाहिर करताच अनेकांनीच पुन्हा एकदा 'चांद्रयान २' मोहिमेविषयीची उत्सुकता व्यक्त केली. 


दरम्यान, नासाकडून ट्विट करत देण्यात आलेल्या माहितीनुसार, फोटोमध्ये दर्शवण्यात आलेले हिरव्या रंगाचे टीपके हे spacecraftचा मोडतोड झालेला भाग आहेत. (असू शकतो). शणमुगा सुब्रमणियनद्वारा मुख्य दुर्घटनास्थळाच्या उत्तर पश्चिमेला जवळपास ७५० मीटरच्या अंतरावर असणाऱ्या अवशेषांना सर्वप्रथम मोजेक (१.३ मीटर पिक्सल, ८४ डिग्री) मध्ये त्याची ओळख पटली.  या अवशेषांमधील तीन तुकडे हे २x२ पिक्सलचे आहेत, असं वैज्ञानिक संज्ञा मांडत सांगण्यात आलं आहे. अधिकृतपणे मिळालेल्या या माहितीनंतर अवशेषांचे पूर्वीची आणि सध्याची छायाचित्र यांच्यात तुलनाही करण्यात आली. 




सप्टेंबर महिन्यात 'चांद्रयान २' मोहिमेच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर विक्रम लँडर चंद्रापासून अवघं २.१ किमी अंतरावर असतानाच इस्रोशी त्याचा संपर्क तुटला होता. मोहिमेच्या या वळणावर विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरीही पुढील चौदा दिवसांमध्ये त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहणार असल्याची हमी इस्रोकडून देण्यात आली होती. पण, यातही काही प्रमाणात इस्रो अपयशी ठरलं. असं असलं तरीही संपूर्ण देशभरातून इस्रोच्या या अतीव महत्त्वाकांक्षी मोहिमेची प्रशंसा करण्यात आली होती.